जळगावात वळण रस्त्यासाठी एकरी दोन कोटीचा दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:44 PM2018-07-17T12:44:15+5:302018-07-17T12:44:42+5:30

One crore rupees for the road to Jalgaon Road | जळगावात वळण रस्त्यासाठी एकरी दोन कोटीचा दर

जळगावात वळण रस्त्यासाठी एकरी दोन कोटीचा दर

Next

जळगाव : शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गाच्या गावाबाहेरून वळण रस्त्याचे काम चौपदरीकरणांतर्गत हाती घेण्यात आले असून वळण रस्त्यासाठी भूसंपदानाची नोटीस सोमवारी प्रसिद्ध झाली. शहरालगतच्या भूसंपादन केलेल्या जागेला सुमारे ५५०० ते ६ हजार रूपये प्रती चौरस मिटर म्हणजेच सरासरी २ कोटी रूपये प्रति एकरी दर दिला जाणार असल्याचे समजते.
दरम्यान जळगाव तालुक्यातील आसोदा, जळगाव शहर व आव्हाणे येथील शेतकºयांची सुनावणी ९ आॅगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी जळगाव यांच्याकडे दुपारी १ वाजता होणार आहे. तर धरणगाव तालुक्यातली पाळधी बु.।।, पाळधी खु.।।, मुसळी बु.।। व वराड खु.।। येथील शेतकºयांची सुनावणी १० आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता धरणगाव तहसील कार्यालय येथे होईल. तर एरंडोल तालुक्यातील शेतकºयांची सुनावणी १० आॅगस्ट रोजी आहे.

Web Title: One crore rupees for the road to Jalgaon Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.