फैजपुरात ठेवीदारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:28 AM2018-08-11T00:28:20+5:302018-08-11T00:32:05+5:30

रावेर- यावल तालुक्यासह सावदा आणि फैजपूर येथील विविध पतसंस्थांमध्ये पैसे अडकलेल्या ठेवीदारांनी गुरूवारी फैजपूर येथील प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.

 One-day metaphorical fasting of depositors in Faizpur | फैजपुरात ठेवीदारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

फैजपुरात ठेवीदारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

Next
ठळक मुद्देठेवीदारांसाठी एक हजार कोटींचे पॅकेजची मागणीपतसंस्था चालकांविरुद्ध एमपीआयडी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी

फैजपूर, जि. जळगाव : रावेर- यावल तालुक्यातील ठेवीदार शेकडो महिला व पुरुषांनी ९ आॅगष्ट क्रांतिदिनी येथील प्रांत कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले, तसेच निवेदन दिले.
निवेदनात प्राधान्याने शासनाकडे पाठवण्यात आलेल्या मृत व गंभीर आजारी व उपवर तसेच महिला ठेवीदारांचा प्रस्ताव, १९९९ च्या कायद्याची अंमलबजावणी, संघटनेच्या मुद्द्यांना न्याय मिळण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. खान्देश ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आले.
यावेळी रावेर यावल तालुक्यातील फैजपूर सावदा येथील पतपेढ्यांमध्ये पैसा अडकून पडलेले ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी यावल येथील सहाय्यक निबंधक यांनी निवेदन स्वीकारले. त्यांच्याशी संघटनेच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली. दिलेल्या निवेदनात शासनाकडे पाठविण्यात आलेल्या मृत, गंभीर आजारी, तसेच महिला ठेवीदारांचा प्रस्ताव पूर्वीचा व नवीन यादी तात्काळ मंजूर करण्यात यावी. किंवा जिल्ह्यातील ठेवीदारांसाठी एक हजार कोटी रुपये तात्काळ मंजूर करण्यात यावे, पतसंस्था चालकांविरुद्ध एमपीआयडी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, तापी पतसंस्थेच्या प्रशासकपदी वर्ग १ अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी. याआधी झालेल्या उपोषणादरम्यान दिलेल्या निवेदनावर काय कारवाई करण्यात आली याचा खुलासा करण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.
 

Web Title:  One-day metaphorical fasting of depositors in Faizpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.