राजीव गांधी नगरात दीडशे आकोडे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:18 AM2021-02-09T04:18:54+5:302021-02-09T04:18:54+5:30
हरिविठ्ठल नगर परिसरातील राजीव गांधी नगरात महावितरणचे शहराचे प्रभारी कार्यकारी अभियंता एन. बी. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी अकरा ...
हरिविठ्ठल नगर परिसरातील राजीव गांधी नगरात महावितरणचे शहराचे प्रभारी कार्यकारी अभियंता एन. बी. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी अकरा वाजता ही कारवाई करण्यात आली. शहरातील विविध शाखांचे अभियंता व ५० हून अधिक महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या नागरिकांच्या घरांवर चढून आकोडे जप्त करण्यात आले. यावेळी काही नागरिकांनी या कारवाईला विरोध केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे सर्व कारवाई शांतेतत पार पडली. या कारवाईत सुमारे दीडशे आकोडे जप्त करण्यात आले.
इन्फो :
कारवाईसाठी सहा अभियंत्याचे नेमले पथक
या कारवाईसाठी प्रभारी कार्यकारी अभियंता एन. बी. चौधरी यांनी सहा सहाय्यक अभियंत्यांचे पथक तयार केले होते. यामध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. डी. डांगे यांचाही या पथकात समावेश करण्यात आला होता. या पथकात सहायक अभियंता अमोल चौधरी, मिलिंद इंगळे, पी. एस. महाजन, आर. एन. कापुरे यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच सोबताला ५० वायरमन देऊन ही कारवाई मोहिम राबविण्यात आली. सुमारे दोन तासांच येथील सर्व आकोडे जप्त करण्यात आले.
इन्फो :
वीज चोरीच्या दंडाबाबत आज निर्णय घेणार
विजेची चोरी उघड झाल्यास संबंधितांवर महावितरणतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यानुसार राजीव गांधी नगरात आकोडे टाकून विजेची चोरी करणारे दीडशे आकोडे चोर सापडले आहेत. या नागरिकांवर दंडात्मक कारवाईबाबत महावितरणतर्फे मंगळवारी निर्णय घेण्यात येणार असल्याचे महावितरण प्रशासनातर्फे सांगण्यात आले.