विषबाधेने एकीचा मृत्यू, तर सात जण अत्यवस्थ
By admin | Published: June 10, 2016 12:21 AM2016-06-10T00:21:02+5:302016-06-10T00:21:02+5:30
नातलगाच्या घर बांधकामासाठी आलेल्या आठ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गोरंबा येथे बुधवारी घडली.
धडगाव : नातलगाच्या घर बांधकामासाठी आलेल्या आठ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गोरंबा येथे बुधवारी घडली. उपचारादरम्यान 19 वर्षीय तरुणीचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. उपचारात दिरंगाई झाल्याचा आरोप करीत मयताच्या नातेवाइकांनी ग्रामीण रुग्णालयासमोर धरणे आंदोलन केल कोबी बारक्या पाडवी (15), विनीता शिवाजी पाडवी (19), आशा जामा पाडवी (11), मोग्या बाठय़ा तडवी (45), मनता मोग्या तडवी (11), ईलू मोग्या तडवी (18), गोविंद मोग्या तडवी (11) सर्व रा़ गोरांबाचा ईडीपाडा व मोशी दामा पाडवी (19़ रा खटय़ारपाडा) यांना बुधवारी धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मोशी दामा पाडवी अत्यवस्थ असताना परिचारिकेने तिच्यावर उपचार केले. त्यातच मोशीचा मृत्यू झाला. संतप्त जमावाने आंदोलन करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली़ पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल़े दुपारी दीड वाजता शवविच्छेदन करण्यात आले. भोंग्या बाठय़ा तडवी यांचे घर बांधणीसाठी मदतकार्यासाठी आलेल्या रुग्णांवरील उपचारासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक क़ेडी़सातपुते यांनी भेट देऊन परिस्थितीची माहिती संबंधित परिचारिकेकडून जाणून घेतली.