नशिराबादला ट्रॅक्टर उलटून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 11:55 AM2020-04-26T11:55:01+5:302020-04-26T11:55:22+5:30

नशिराबाद : शेतात कुट्टी तयार करून घराकडे परतणारे ट्रॅक्टर उलटल्याने एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. ...

One killed as tractor overturns in Nasirabad | नशिराबादला ट्रॅक्टर उलटून एक ठार

नशिराबादला ट्रॅक्टर उलटून एक ठार

Next

नशिराबाद : शेतात कुट्टी तयार करून घराकडे परतणारे ट्रॅक्टर उलटल्याने एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना नशिराबाद शिवारात भादली रोडवर पाटचारीत शुक्रवारी रात्री घडली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या जखमी विजेंद्र विश्राम गुजर (४५, मूळ गाव चांदपूर, जि अलवर, राजस्थान हल्ली मुक्काम नशिराबाद) यांचा शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, सचिन कापडणीस, किरण बाविस्कर, प्रवीण ढाके, राजेंद्र साळुंखे, हेमंत मिटकरी, बाळू पाटील, सतीश पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. नशिराबाद पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर चालक फरार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
तीन जणांवर उपचार सुरू
जनावरांसाठी लागणाऱ्या कडब्याची कुट्टी तयार करून शेतातून घराकडे ट्रॅक्टर घेऊन परतत असताना अचानक रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर उलटले. त्यात ट्रॅक्टर मधील विजेंद्र गुजर व सोबतचे सहकारी यांना जबर दुखापत झाली. त्यात विनोद प्रल्हाद जोहरे (३२), प्रशांत अशोक येवले (४०), रमेश नामदेव माळी (५०, सर्व नशिराबाद) हे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरूआहे.

Web Title: One killed as tractor overturns in Nasirabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव