चाळीसगावात दोन गटातील हाणामारीत एकाचा मृत्यू
By admin | Published: May 27, 2017 06:19 PM2017-05-27T18:19:19+5:302017-05-27T18:19:19+5:30
आरोपींच्या अटकेसाठी पोलीस स्टेशनवर जमाव
Next
>ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव,दि.27- पूर्व वैमनस्यातून अनिलनगरातील दोन गटात झालेल्या हाणामारीत मुन्ना शहार याचा धुळ्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत 7 जण जखमी झाले होते. ही घटना 26 रोजी दुपारी साडेचार वाजता करगाव रोडवरील उन्नती मंडळाजवळ घडली होती. या घटनेचे दुस:या दिवशी पडसाद उमटले. एकाचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने पोलीस स्टेशनवर धडकत आरोपीच्या अटकेची मागणी केली.
या घटनेबाबत परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहे. सैयद वसीम सैयद याकूब यांनी दिलेल्या फियार्दीत म्हटले आहे की, मैनू शहा, मुन्ना शहा, शकील शहा, संजीव शहा, अशपाक शहा, हैदर अली सैयद (सर्व रा. अनिलनगर) यांनी फिर्यादी याला मारहाण केली. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला.
दुस:या फियार्दीत रियाज शहा कादर शहा यांनी म्हटले आहे की, नसीर उर्फ अप्पी मिङरा, वसीम सैयद याकूब सैयद, वसीमचा मोठा भाऊ, कामरान बेग, बबलू मिङरा व अन्य 4-5 जणांनी हातात लाठय़ाकाठय़ा , तलवार , कोयते घेवून मशिदीजवळ व करगाव रोडवरील उन्नती मंडळाच्या शाळेजवळ मुन्ना शहा, हैदर अली सैयद, सलीम शहा यांच्यांवर प्राणघातक हल्ला केला. तीन जण गंभीर असून त्यांना धुळे शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. यातील मुन्ना शहा याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सलीम शहा व हैदरअली याचेवर उपचार सुरु आहेत.
पोलीस पोलीस स्टेशनमध्ये जमाव
जखमी मुन्ना शहा याचा मृत्यू 26 रोजी सायंकाळी 6 वाजता झाला मात्र ही माहिती नातेवाईकांना कळविली नाही. 27 रोजी सकाळी माहिती कळताच संतप्त जमावाने पोलीस स्टेशन गाठले व आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी लावून धरली. मुन्ना शहा याचा मृतदेह शनिवारी दुपारी 1 वाजता अनिलनगरात आल्यावर त्याची प}ी व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दुपारी अनिलनगर व स्टेशन परिसरातील सर्व दुकाने बंद होती. या भागातील वाहतूकही काही तास ठप्प झाली होती. पातोंड यांनी तात्काळ पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवल्यावरुन दंगा नियंत्रण पथक, सीआरपीचे जवानांची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. दुपारी साडेतीन वाजता मुन्ना शहा याची अंत्ययात्रा काढण्यात आली.