जळगाव जिल्ह्यात एक लाख 90 हजार वृक्ष लागवड
By admin | Published: July 2, 2017 11:23 AM2017-07-02T11:23:40+5:302017-07-02T11:23:40+5:30
प्रशासनाचा दावा : रामदेव वाडी येथून शुभारंभ
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.2 : जिल्ह्यात चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शनिवारी रामदेव वाडी येथून शुभारंभ झाला़ जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये शाळा, महाविद्यालये, रस्त्यांच्या दुतर्फा, ग्रामपंचायत आदी ठिकाणी मान्यवरांचे हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली़ जिल्हाभरात 1 लाख 90 हजार वृक्षांची लागवड झाल्याची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी दिली़
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, आमदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत रामदेववाडी येथे वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ झाला़ या वेळी उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, रामदेववाडीचे सरपंच संतोष राठोड, शिरसोली येथील बारी विद्यालयाचे हरित सेनेच्या विद्याथ्र्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 1 ते 7 जुलै दरम्यान जिल्ह्यात वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात 21 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यात 23 लाख 66 हजार खड्डे तयार आहेत. या कालावधित शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था व नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणार आहेत.