११ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख अर्थसहाय्य मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 09:35 PM2020-08-10T21:35:09+5:302020-08-10T21:35:22+5:30
जळगाव : जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली़ या बैठकीत एकूण १४ ...
जळगाव : जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली़ या बैठकीत एकूण १४ प्रकरणे ठेवण्यात आली होती़ त्यापैकी ११ प्रकरणे पात्र ठरली असून त्यांना अर्थ सहाय्य मंजूर करण्यात आले आहे़ तर दोन प्रकरणे अपात्र तर एक प्रकरण फेरचौकशीसाठी ठेवण्यात आले आहे.
यावेळी बैठकीमध्ये समितीचे अशासकीय सदस्य विश्वनाथ पाटील, रोहिदास पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी आदी उपस्थित होते.
या शेतकºयांच्या वारसांना अर्थसहाय्य मंजूर
रामराव पांडुरंग पाटील, आबासाहेब अमृत काळे, संदीप ईश्वर चौधरी, मोतीराम कौतिक पाटील, प्रफुल्ल अरुण पाटील, गजानन घन:श्याम पाटील, समाधान करतारसिंग पाटील, गुलाब लक्ष्मण महाजन (माळी), नीलेश प्रमोद पाटील, मोतीलाल रामदास पाटील, गोपीचंद पुंडलिक पाटील या आत्महत्याग्रस्त शेतकºयांची प्रकरणे मंजूर करण्यात करण्यात आली असून त्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत शासनातर्फे अर्थसहाय्य म्हणून देण्यात येणार आहे़