घरी जाणा-या प्रवाशाचे रिक्षातून एक लाख लांबविले, जळगावातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 01:04 PM2017-12-21T13:04:01+5:302017-12-21T13:06:34+5:30
गुन्हा दाखल
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 21- आरटीओ कार्यालयातील काम आटोपून रिक्षाने घरी जाणा:या जनार्दन गुलाब पाटील (रा.आदर्श नगर, जळगाव) यांच्या खिशातील रिक्षातील सह प्रवाशाने एक लाख रुपये लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी साडे बारा वाजता घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जनार्दन पाटील हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. बुधवारी आरटीओ कार्यालयात कामासाठी आले होते. ते काम आटोपल्यानंतर आदर्श नगराकडे रस्त्याने पायीच जात असताना एक रिक्षा चालक त्यांच्याजवळ आला. मी डी.मार्टकडे जात असून तुम्हाला रस्त्यात सोडतो असे सांगून पाटील यांना रिक्षात बसविले. मागे दोन प्रवाशी बसलेले होते. रिक्षातून उतरल्यानंतर खिशातील एक लाख रुपये गायब झाल्याचे लक्षात आले. रिक्षा चालकाचे नाव व त्याचा क्रमांकही पाटील यांना सांगता आला नाही. त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात रिक्षा चालकाविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.