अमळनेर स्थानकातून मारवड येथील एकाचे एक लाख रुपये लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 02:17 PM2019-04-16T14:17:32+5:302019-04-16T14:17:43+5:30
अमळनेर बस स्थानक परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे मधून टिपलेले छायाचित्र व व्हिडीओ पोलिसांनी तपासले असून त्या आधारे रेखाचित्र तयार करून चोरट्याचा मागोवा पोलीस घेत आहेत.
अमळनेर : मित्राकडून उसनवार आणलेले एक लाख रुपये अज्ञात चोरट्याने हिसकावून लंपास केल्याची घटना अमळनेर बसस्थानकावर दुपारी १ वाजता घडली.
आपले कर्ज फेडण्यासाठी मित्राकडून एक लाख रुपये उसणवार घेऊन मारवड येथील बाबुराव दौलतराव पाटील हे अमळनेर बस स्थानक येथून दुपारी १ वाजता सुटणारी अमळनेर ते नीम बसने घरी येण्यासाठी बसमध्ये चढत असतांना दरवाजा जवळ मागून आलेल्या एका अनोळखी तरुणाने त्यांच्या जवळ असलेली एक लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी ओढून पळाला. ही बाब इतर प्रवाशांना लक्षात येताच त्यांनी त्या चोरट्याचा पाठलाग केला. मात्र जोरदार धूम ठोकत बसस्थानक गेट नंबर एक बाहेर येताच मागून आलेल्या अज्ञात मोटर सायकलवर बसून पळून गेला. याबाबत सायंकाळी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून े अमळनेर बस स्थानक परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे मधून टिपलेले छायाचित्र व व्हिडीओ पोलिसांनी तपासले असून त्या आधारे रेखाचित्र तयार करून चोरट्याचा मागोवा पोलीस घेत आहेत, गेल्या आठवड्यात शिरपूर तालुक्यातील अर्थे येथील महिलेचे दागिन्यांची पर्स ही लांबविण्यात आली होती.