चाळीसगावात धूम स्टाईलने एक लाख ९० हजाराची रोकड लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 05:03 PM2018-02-07T17:03:00+5:302018-02-07T17:05:56+5:30
शेती विक्रीचे पैसे बँकेतून घरी घेऊन जात असताना धूम स्टाईलने आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी एक लाख ९० हजाराची रोकड लांबविल्याची घटना चाळीसगाव शहरातील डेअरी भागात बुधवारी दुपारी पावणे दोन वाजता घडली.
आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव: दि. ७ : शेती विक्रीचे पैसे बँकेतून घरी घेऊन जात असताना धूम स्टाईलने आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी एक लाख ९० हजाराची रोकड लांबविल्याची घटना चाळीसगाव शहरातील डेअरी भागात बुधवारी दुपारी पावणे दोन वाजता घडली.
प्रवीण दिनकर पाटील (वय ३७) हे मुंबई येथे खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. चाळीसगाव येथे डेअरी भागात त्यांचे आई - वडील राहतात. पाटील यांनी त्यांच्या मालकीची शेतजमिन एक लाख ९० हजार रुपयांना विकली. ही रक्कम बँकेत भरण्यासाठी ते स्टेशन रोड लगतच्या एचडीएफसी बँकेत गेले. त्यांचे पगार खाते असल्याने बँकेने रक्कम स्विकारण्यास नकार दिला.
यानंतर प्रवीण पाटील हे रक्कम परत घेऊन येतांना घराजवळ त्यांना मोटारसायकलवर ( ४९३० पुर्ण क्रमांक माहित नाही) आलेल्या दोघा चोरट्यांनी धक्का देऊन त्यांच्याकडील एक लाख ९० हजाराची रोकड लंपास केली. चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.