कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी नेमली एक सदस्यीय समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:18 AM2021-02-11T04:18:23+5:302021-02-11T04:18:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचे पगार देण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचे पगार देण्यासाठी विद्यापीठात दीपक पाटील यांची एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. त्यामुळे व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णु भंगाळे, देवेंद्र मराठे यासह इतर सदस्यांनी कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांच्याशी चर्चा केली.
कामगारांचे पगार काढण्यासाठी विधी अधिकारी आणि वित्त अधिकारी यांचा या समितीत समावेश का केला नाही. या प्रश्नावरून व्यवस्थापन परिषदेचे सदस्य भडकले. पगाराची बिले काढण्यासाठी विधी माहिती अधिकारी, कुलसचिव यांच्याकडे पाठवु नये असेही ठरवण्यात आले. त्यामुळे या एकमेव सदस्याला ही पगार बिले काढण्याचा अधिकार कुणी दिला. आणि असे ठराव करता येतात का, असा प्रश्न यावेळी विष्णू भंगाळे आणि अन्य सदस्यांनी उपस्थित केला. त्यावेळी विधी अधिकारी यांनी असा ठराव करता येत नाही, असे स्पष्टीकरण देखील विधी अधिकारी यांनी दिले. वित्त विभागाचे व्यवहार खुले करायचे नाही, असेही या ठरावात म्हटले आहे.
यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य अतुल कदमबांडे, शिवराज पाटील, भुषण भदाणे, कुणाल पवार उपस्थित होते.
कोट - विद्यापीठात मर्जीप्रमाणे खरेदी विक्री, पगार बिले काढता यावे, यासाठी एकसदस्यीय समिती केली असावी. तसेच विधी आणि वित्त अधिकारी यांची विद्यापीठाला गरज का वाटली नाही. - देवेंद्र मराठे