जगदंबेच्या दरबारात दरवळला एक लाख किलो धूपचा सुगंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:19 PM2019-10-07T12:19:24+5:302019-10-07T12:20:17+5:30
नवरात्रोत्सव : पावडर, कोन धूपसह आता कप धूपचीही चलती
जळगाव : नवरात्रोत्सवात देवीला गुगूळ व इतर होमहवनच्या सामग्रीचा वापर करून पूजा करण्याची प्रथा असताना त्यात धूपचाही मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. त्यानुसार यंदा नवरात्रोत्सवात शहरात एक लाख किलो धूपची विक्री होऊन दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली.
गणेशोत्सवापासून अगरबत्ती, धूप यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. त्यात नवरात्रोत्सवात देवीच्या स्थापना होणाऱ्या मंडळासह घरोघरी होमहवन होते. सोबतच दररोज धूप लावून देवीची आराधना केली जाते. यंदा नवरात्रोत्सात मोठ्या प्रमाणात पूजा साहित्याची विक्री झाली. त्यात दुर्गाष्टमीला तर अनेकांकडे फुलोरा, होमहवनसाठी सर्वच पूजा साहित्याची सर्वाधिक विक्री होते. त्यानुसार यंदाही रविवारी असलेल्या दुर्गाष्टमीसाठी शनिवारीच मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.
त्यात यंदाच्या नवरात्रोत्सवातील केवळ धूपच्या उलाढालीचा आढावा घेतला तर तब्बल एक लाख किलो धूप या उत्सवासाठी विक्री झाले. १० ते १०० रुपये प्रती नग या प्रमाणे विक्री झालेल्या धूपच्या माध्यमातून तब्बल दोन कोटी रुपयांचे धूप विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
कप धूप
बाजारात पावडर धूप, कोन धूप असे प्रकार पूर्वीपासूनच उपलब्ध आहे. त्यात आता कप धूपची भर पडली असून या प्रकारच्या धूपला जास्त मागणी वाढली आहे. या धूपचे वैशिष्ट म्हणजे कप अथवा वाटीच्या आकारातील धूपमध्ये होमहवनची सामग्री असते. धूपच्या एका कोपºयावर हे धूप पेटविले की ते गोलाकार आकारात पेटत जावून त्यातील सामग्रीही पेटते. त्यामुळे सर्वत्र धूपदानीची अनुभुती येते. बाजारात लोभान, गुगूळ, हवन, उद तसेच लोभान व उद एकत्रित असे या कप धूपचे विविध प्रकार विक्रीला आहे.
४एरव्ही नेहमीदेखील लोभान लावल्याने भूत पिशाच्च होेत नाही, अशी अनेकांची श्रद्धा असल्याने लोभान धूपची या कारणामुळेही खरेदी होत आहे. तसेच धूप लावल्याने डासचाही त्रास होत नसल्याने अनेक जण श्रद्धेसोबतच यासाठीही धूपला पसंती देतात. मात्र नेहमीपेक्षा नवरात्रात तर धूपला अधिकच मागणी वाढल्याने यात मोठी उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.