मद्यपीने बाटली मारल्याने एक जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2017 12:31 AM2017-01-12T00:31:22+5:302017-01-12T00:31:22+5:30
शास्त्री नगरात प्रभाग क्रमांक 28 मध्ये रूग्णालय व शाळेच्या जवळच बियरबार व रेस्टॉरन्ट राजरोसपणे सुरू असून यामुळे नागरीक त्रस्त आहेत़
जळगाव : रामानंद परिसरातील शास्त्री नगरात प्रभाग क्रमांक 28 मध्ये रूग्णालय व शाळेच्या जवळच बियरबार व रेस्टॉरन्ट राजरोसपणे सुरू असून यामुळे नागरीक त्रस्त आहेत़ शनिवारी रात्री येथील मद्यपींनी किरकोळ कारणावरून बार शेजारील एकाच्या नाकावर बाटली मारल्याने तो जखमी असल्याने हा बियरबार बंद करावा किंवा त्याचे अन्यत्र स्थलांतर करावे, या मागणीसाठी भाजप नगरसेवकांनी बुधवारी स्वाक्षरी मोहिम राबविली़ यात पाचशेवर नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असून गुरूवारी स्वाक्षरी मोहिमेची प्रत तसेच निवेदन जिल्हाधिका:यांना देण्यात येणार आह़े
सात ते आठ महिन्यांपूर्वी हा बियरबार तसेच रेस्टॉरंन्ट सुरू झाल़े अरूंद रस्ता, बारपासून काही अंतरावर शाळा, तसेच रूग्णालय असल्याने आधीच येथील रहिवाशांचा हॉटेलला विरोध होता मात्र तरीही हॉटेल सुरू झाल़े रूग्णालयात जाणा:या महिला तसेच पुरूषांना तसेच शाळेतील विद्याथ्र्याना मद्यपींचा त्रास होत असल्याच्या तक्रारी भाजप नगरसेविका उज्वला बेंडाळे यांना देण्यात आल्या होत्या़
बुधवारी हॉटेल शेजारीच काही अंतरावर स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली़ सकाळी 11 वाजता मोहिमेला सुरवात झाली़ यावेळी नगरसेविका उज्वला बेंडाळे, नगरसेवक विजय गेही, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, मंडल अध्यक्ष जीवन अत्तरदे, मंडल अध्यक्ष धीरज सोनवणे, डॉ.सतीश चौधरी, डॉ.सुरेंद्र सुरवाडे, अतुल हाडा, वैशाली पाटील, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बावीस्कर, वंदना पाटील, भाग्यश्री चौधरी, बापु कुमावत, किशोर चौधरी, जयंत राणे, बापू झोपे, रेखा पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होत़े
या स्वाक्षरींची प्रत गुरूवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना सादर करण्यात येणार असल्याचे नगरसेविका उज्वला बेंडाळे यांनी सांगितल़े
मद्यपींनी बाटली मारल्याने एक जखमी
हॉटेलशेजारी मनोज संतोष चौधरी हे राहतात़ मंगळवारी रात्री गोंगाट असल्याने आवाज कमी करण्याचे मनोज पाटील यांनी चार ते पाच जणांना सांगितल़े याचा राग आल्याने संबंधितांनी मनोज चौधरी यांच्या नाकावर बाटली मारली़ जखमी असल्याने त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ याबाबत रामानंद पोलिसात तक्रार देण्यात आली आह़े नेहमीचा त्रास तसेच ही घटना घडल्याने हॉटेल बंद करण्याबाबत स्वाक्षरी मोहिम राबविल्याचे नगरसेविका बेंडाळे यांनी सांगितल़े