गाय, म्हैस दूध खरेदीदरात एक रुपयाची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:37 PM2020-02-03T12:37:53+5:302020-02-03T12:38:29+5:30
दापोरा, ता. जळगाव : : जिल्हा दूध संघाकडून १ फेब्रुवारीपासून गाय व म्हैस दूध खरेदी दरात एक रुपयाची वाढ ...
दापोरा, ता. जळगाव : : जिल्हा दूध संघाकडून १ फेब्रुवारीपासून गाय व म्हैस दूध खरेदी दरात एक रुपयाची वाढ करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या जिल्हा दूध संघाचे कार्यकारी मंडळाच्या सभेत घेण्यात आला.
या निर्णयाने दूध उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. जिल्हा दूध संघाकडून दूध उत्पादकांना सर्वाधिक दर दिला जात असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे गुराचा चारा सर्वत्र नष्ट झाला असल्याने दूध उत्पादकाना चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात अधिकचा खर्च होत आहे आणि त्यात पशुखाद्याचे दर यामुळे काही प्रमाणात दूध उत्पादनाचे नियोजन कोलमडले आहे. मात्र जिल्हा दूध संघाकडून वेळोवेळी होत असलेली भाववाढीमुळे उत्पादकाना दिलासा मिळत आहे.
-जिल्हा दूध संघाकडून नवीन गाय व म्हैस दूध खरेदी दरात एक रुपयाची वाढ होऊन हे दर १ फेब्रुवारीपासून २५५ प्रति किलो फॅट घनघटक प्रमाणे लागू होणार आहेत.
-त्यात ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी ३०.६० रुपये भाव मिळेल.
-म्हैस दूध खरेदी दर ६६६.७० प्रति किलो फॅट ६ फॅट व ९ एसएनएफसाठी ४० रु सर्वाधिक भाव मिळेल.