अपघातात विकासोचा एक सचिव ठार तर दुसरा सचिव जखमी
By Admin | Published: May 17, 2017 12:51 PM2017-05-17T12:51:39+5:302017-05-17T12:51:39+5:30
हा अपघात चोपडा-धरणगाव रस्त्यावरील नीमगव्हाणजवळ झाला
ऑनलाइन लोकमत
चोपडा, जि. जळगाव, दि. 17 - ट्राला व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात शिवाजी गणपत सावंत (वय 52, रा. चामगाव ता. धरणगाव) हे जागीच ठार तर शालिग्राम वामन भालेराव (वय 56, रा. बाभूळगाव ) हे जखमी झाले. हा अपघात चोपडा-धरणगाव रस्त्यावरील नीमगव्हाणजवळ झाला.
चोपडय़ाकडून धरणगावकडे जाणा:या दुचाकीस (क्र. एमएच 19-एके 1625) समोरून येणा:या ट्रालाने (क्र. जी. टी. 13 -एटी. 5213) जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील शिवाजी सावंत हे जागीच ठार झाले. तर शालिग्राम भालेराव हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जळगाव जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.
मयत शिवाजी सावंत हे बाभुळगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सचिव होते तर जखमी शालिग्राम भालेराव हेदेखील उखवाडी विकासोचे सचिव आहेत.
या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला ट्राला चालक अरुण मावजीभाई पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.