विनयभंग प्रकरणी एक वर्षाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:45 PM2019-03-23T23:45:08+5:302019-03-23T23:45:20+5:30

तीन हजार दंड

 One year sentence in molestation case | विनयभंग प्रकरणी एक वर्षाची शिक्षा

विनयभंग प्रकरणी एक वर्षाची शिक्षा

Next

जामनेर : नांद्रा हवेली, ता.जामनेर येथील महिलेच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी नामदेव रामचंद्र नवधरे यास न्या. मुकुल चितळे यांनी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व तीन हजार दंडाची शिक्षा सुनावली. आरोपीने २२ आॅक्टोबर २०१५ रोजी फिर्यादी महिलेच्या घरात तिच्या मयत पतीच्या फोटोचे पाय पडण्याच्या निमित्ताने गेला व तिचा विनयभंग केला होता. जामनेर पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्यात न्यायालयाने चार साक्षीदार तपासले. सरकारी वकील अ‍ॅड.कृतिका भट यांनी बाजू मांडली. सहाय्यक फौजदार संभाजी पाटील व हवालदार सोनवणे यांनी सहकार्य केले.

 

Web Title:  One year sentence in molestation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव