रावरेच्या दंगलीत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 09:53 PM2020-03-23T21:53:13+5:302020-03-23T21:57:17+5:30

पोलिसांवरही हल्ला : ३५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

one,killed,in,raver,riot | रावरेच्या दंगलीत एकाचा मृत्यू

रावरेच्या दंगलीत एकाचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्दे३ लाख ६० हजार रू चे नुकसान२५ जाणांना ताब्यात घेण्यात आले
वेर : येथील राजे छत्रपती शिवाजी चौक, बारीवाडा, मंगरूळ दरवाजा व संभाजीनगर भागातील दोन गटात रविवारी झालेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला आहे. तर या दंगली मागील कारणही स्पष्ट झाले असून कोरोना व्हायरसला पायबंद घालण्यासाठी जनता कर्फ्यू पुकारला असतांना मन्यारवाड्यातील धार्मिक स्थळासमोर रस्त्यावर गर्दी का करता? असे हटकल्याचा राग आल्याने ही दंगल भडकली होती. दोन गटात रविवारी झालेल्या या दंगलीत तुफान दगडफेक करण्यात आली. तसेच काचेच्या बाटल्या व पेट्रोल बॉम्ब फेकून पोलीसांना जखमी केले. यादरम्यान यशवंत काशीराम मराठे (वय ५५) रा. संभाजीनगर यांचा गाढ झोपेतच उन्मत्त झालेल्या दंगेखोरांनी डोक्यावर कुºहाडीचा घाव घालून निर्घृणपणे हत्या केली. तर त्यालगतच्या सुभाबाई भानूदास महाजन या फळभाज्या विक्रीचा व्यवसाय करणाºया विधवा महिलेच्या घरात जाळपोळ व तोडफोड केली. तथा निलेश भगवान जगताप रा संभाजीनगर , डिगंबर ओंकार आस्वार रा. बारीवाडा व शेख जावेद शेख सलीम रा. रसलपूर यांना लाठ्या, तलवार व कुºहाडीचे घाव घालून सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे ३ लाख ६० हजार रू चे नुकसान केले. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिनियम कलम ३५ चे व राष्ट्रीय आपत्ती कायदा कलम १८८ चे जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १३५ अन्वये कायदा व सुव्यवस्था बिघडवून दहशत निर्माण करून, शासकीय कर्मचाºयांवर जीवघेणा हल्ला करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सुमारे ३५० जणांविरुद्ध सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सुमोर २५ जाणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: one,killed,in,raver,riot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.