विद्याथ्र्याचीही ऑनलाइन हजेरी
By admin | Published: January 8, 2017 12:07 AM2017-01-08T00:07:23+5:302017-01-08T00:07:23+5:30
‘उपस्थिती’ अॅप : शाळांवर राहणार राज्यस्तरावरून ऑनलाइन पद्धतीने वॉच, कार्यवाही सुरू
धुळे : शालेय पोषण आहारासंबंधी ऑनलाइन माहितीनंतर आता शिक्षण विभागाने विद्याथ्र्याची दैनंदिन हजेरीही ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शिक्षण विभागाने ‘उपस्थिती’ नावाचे अॅप विकसित केले आहे. ऑनलाइन हजेरीची अंमलबजावणी तत्काळ करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
स्टुडंट पोर्टलवर माहिती
शिक्षण विभागाने विकसित केलेल्या सरल प्रणालीमध्ये स्टुडंट पोर्टलमध्ये ही माहिती संकलित करण्यात येणार आहे. विद्याथ्र्याची दैनंदिन हजेरी भरण्यासाठी डेली अटेंडन्स अॅप डाऊनलोड करण्यासाठी स्टुडंट पोर्टलवर सोय करण्यात आली आहे.
दररोज भरावी लागणार माहिती
या अॅपमध्ये सर्व शाळांनी माहिती दररोज भरावयाची आहे. तुकडी व इयत्तानुसार हजेरी भरावी लागणार आहे. यासाठी शिक्षकांना पूर्वतयारी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक शिक्षकाकडे स्मार्ट फोन
यासाठी प्रत्येक शिक्षकाकडे स्मार्ट फोन असणे गरजेचे आहे. या मोबाइलवरूनच शिक्षकांना ही माहिती भरावयाची आहे.
अॅप डाउनलोड करण्यापूर्वी
हे अॅप मोबाइलवर डाऊनलोड करण्यापूर्वी शाळांना आपल्या स्टुडंट पोर्टलवर दोन सुधारणा कराव्या लागणार आहेत.
बदली करून गेलेले शिक्षक डिलीट करून नवीन शिक्षक क्रिएट करावे लागणार आहेत. या दुरुस्त्या स्टुडंट पोर्टलच्या मेंटेनन्स टॅबमध्ये कराव्या लागणार आहे.
क्रिएट टीचर या मेन्युत प्रत्येक शिक्षकाचा मोबाइल क्रमांक अॅड करून एक आयडी नंबर तयार करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक वर्ग किंवा तुकडीचा शिक्षक नेमावा लागणार आहे.
रजिस्टर मोबाइलने लॉगिन
वरील प्रक्रिया झाल्यानंतर स्टुडंट पोर्टलवर जाऊन हे उपस्थिती अॅप डाउनलोड करावे लागणार आहे. शाळेचा युडायस क्रमांक टाकून आपल्या रजिस्टर मोबाइलने लॉगिन करावे लागणार आहे. हा मोबाइल नंबर बदलण्याची सोयही यामध्ये करण्यात आलेली आहे.
फक्त अनुपस्थितांची माहिती
उपस्थिती अॅपमध्ये शिक्षक तुकडी, दिनांक निवडून विद्याथ्र्याची हजेरी भरावयाची आहे. यामध्ये फक्त अनुपस्थित विद्याथ्र्याचीच माहिती शिक्षकांना भरावी लागणार आहे. या माहिती ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाची आहे. यानंतर अटेंडन्स रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर शिक्षकाला वर्गातील प्रत्येक विद्याथ्र्याची हजेरी दिनांकानुसार पाहता येणार आहे.
मोबाइल वापर परिणामकारपणे
सध्या शिक्षण विभागाकडून अॅण्ड्रॉईड मोबाइलचा उपक्रम परिणामकारकपणे सुरू केला आहे. शालेय पोषण आहाराची माहिती भरण्यासाठीही शिक्षण विभागाने अॅप सुरू केले आहे. हा शिक्षण विभागाचा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला आहे.
त्यामुळेच शिक्षण विभागाने मोबाइलचा वापर परिणामकारकपणे सुरू केला आहे. ज्याठिकाणी शाळा डिजिटल करणे शक्य नाही त्याठिकाणी मोबाइल डिजिटल शाळा सुरू केल्या आहेत. या माध्यमातून विद्याथ्र्याना ऑनलाइन शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.
विद्याथ्र्याच्या ऑनलाइन हजेरीसंदर्भात राज्यस्तरावरून आदेश आलेले आहेत. हे अॅप ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध झालेले आहे. उपस्थिती अॅप झाल्यामुळे यावर लगेच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
-मोहन देसले,
प्राथमिक शिक्षणाधिकारी.