ऑनलाइन वर्ग अन् वर्क फ्रॉम होममुळे ऑप्टीकल फायबरच्या मागणीत अडीच पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:21 AM2021-07-07T04:21:23+5:302021-07-07T04:21:23+5:30

सचिन देव जळगाव : कोरोनामुळे सध्या शाळा-महाविद्यालय बंद आहेत. विद्यार्थांचे सुरू असलेले ऑनलाइन वर्ग आणि दुसरीकडे नोकरदार वर्गाच्या ...

Online class work from home has doubled the demand for optical fiber | ऑनलाइन वर्ग अन् वर्क फ्रॉम होममुळे ऑप्टीकल फायबरच्या मागणीत अडीच पट वाढ

ऑनलाइन वर्ग अन् वर्क फ्रॉम होममुळे ऑप्टीकल फायबरच्या मागणीत अडीच पट वाढ

Next

सचिन देव

जळगाव : कोरोनामुळे सध्या शाळा-महाविद्यालय बंद आहेत. विद्यार्थांचे सुरू असलेले ऑनलाइन वर्ग आणि दुसरीकडे नोकरदार वर्गाच्या ‘वर्क फ्रॉम होम`मुळे ऑप्टीकल फायबरच्या मागणीत तीन महिन्यात दुप्पट वाढ झाली आहे.

गेल्या काही वर्षांत मोबाइल कंपन्यांची वाढती संख्या आणि या कंपन्यांकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या आकर्षक ऑफरमुळे याचा बीएसएनएलसाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. गेल्या वर्षापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यामुळे अनेक खासगी व सरकारी संस्थांमधील कर्मचारी घरी बसून (वर्कफ्रॉम होम) काम करीत आहेत. घरगुती कामासाठी इंटरनेटची आवश्यकता लागत असल्यामुळे, नागरिक बीएसएनएलच्या ऑप्टीकल फायबरच्या कनेक्शनला पसंती देत आहेत. तर काही नागरिक ब्रॉन्डब्रँडचे कनेक्शन बंद करून, ऑप्टीकल फायबरचेच कनेक्शन घेत आहेत. गेल्या तीन महिन्यात तीन हजार नवीन ग्राहकांनी ऑप्टीकल फायबरचे नवीन कनेक्शन घेतले असल्याची माहिती बीएसएनएलतर्फे देण्यात आली.

चौकट :

ऑप्टीकल फायबरला ५० ते १०० एमबीपीएसची गती

बीएसएनएलच्या ब्रॉन्डब्रँडच्या इंटरनेटची गती प्रति सेकंदाला २ ते ५ एमबीपीएस आहे; मात्र ऑप्टीकल फायबरचा स्पीड प्रत्येक सेकंदाला ५० ते १०० एमबीपीएस आहे. जर एखादी फाईल ब्रॉन्डब्रँडच्या इंटरनेटवरून डाऊनलोड करायची असल्यास, त्याला सरासरी पाच ते दहा मिनिटे लागतात; मात्र तीच फाइल ऑप्टीकल फायबरच्या इंटरनेटवरून अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड होत असल्याचे बीएसएनएलतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

गेल्या तीन महिन्यात तालुकानिहाय ऑप्टीकल फायबरची वाढलेली ग्राहक संख्या

१ एप्रिल २०२१ ते ६ जुलै २०२१

जळगाव : १ हजार २८५ २ हजार ७१५

भुसावळ : १२२ ९०९

रावेर : २६ ९७

मुक्ताईनगर : ७६ २२५

जामनेर : ०० ७९

बोदवड : १३ २२

पाचोरा : १९ २१

भडगाव : ५ १९

चाळीसगाव ६० २९७

पारोळा : ३० १११

धरणगाव : ७ १२

अमळनेर : ७३ १०७

चोपडा : १२५ २१४

यावल : १५६ २०२

एकूण : २ हजार २५ ५ हजार २

इन्फो :

कोरोनामुळे अनेक कंपन्यांचे कर्मचारी `वर्क फ्रॉम होम`काम करीत आहेत, तसेच शाळा-महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थीही घरी बसूनच शिक्षण घेत आहेत. बीएसएनएलच्या ऑप्टीकल फायबरच्या सेवेला गेल्या तीन महिन्यात अडीच पट ग्राहक संख्या वाढली आहे.

संजय केशरवाणी, महाव्यवस्थापक, बीएसएनएल, जळगाव विभाग.

Web Title: Online class work from home has doubled the demand for optical fiber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.