नाहाटा कॉलेजमध्ये रसायनशास्त्रावर ऑनलाइन परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:55+5:302021-06-25T04:12:55+5:30

भुसावळ : येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषद झाली. परिषदेचे ...

Online conference on chemistry at Nahata College | नाहाटा कॉलेजमध्ये रसायनशास्त्रावर ऑनलाइन परिषद

नाहाटा कॉलेजमध्ये रसायनशास्त्रावर ऑनलाइन परिषद

Next

भुसावळ : येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषद झाली. परिषदेचे उद‌्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे संजयकुमार नाहाटा यांनी केले.

यावेळी प्राचार्या डॉ. मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ. एस.व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. बी.एच. बऱ्हाटे, परिषदेचे चेअरमन डॉ. सचिन येवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या परिषदेत रसायनशास्त्रातील सिद्धांतिक व गणकीय रसायनशास्त्र, रासायनिक अभिक्रिया, जैविक उत्पादकता, हरित रसायनशास्त्र, पर्यावरण रसायनशास्त्र, पॉलिमर रसायनशास्त्र इ. रसायनशास्त्रातील वेगवेगळ्या विषयांबद्दल मार्गदर्शन झाले.

परिषदेत संशोधक व विद्यार्थी मिळून देशभरातील १५५ संशोधक प्राध्यापकांनी सहभाग घेतला.

प्रथम सत्रात प्रा. राजेंद्र झोपे (अमेरिका) यांनी डेन्सिटी फंक्शनल थेअरीमधील नवीन बदल तसेच त्यांच्या ग्रुपने शोधलेले एसआयसी - डीएफटी या पद्धतीबद्धल माहिती दिली.

उपप्राचार्य डॉ. ए.डी. गोस्वामी, उपप्राचार्य डॉ. एन.ई. भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे चेअरमन डॉ. सचिन येवले, परिषदेचे समन्वयक डॉ. उमेश फेगडे, सचिव प्रा. चंद्रकांत सरोदे, उपसचिव डॉ. विलास महिरे, डॉ. जी.आर. वाणी, प्रा. डी.एन. पाटील, परिषद कोषाध्यक्ष प्रा. संगीता भिरूड, प्रा. नीलिमा पाटील, प्रा. तेजश्री झोपे, डॉ. सचिन कोलते, डॉ. अजय क्षीरसागर, प्रा. शंकर पाटील, प्रा. हर्षल पाटील यांनी परिश्रम घेतले, असे परिषद प्रसिद्धी समितीप्रमुख प्रा. प्रशांत पाटील यांनी कळविले आहे.

Web Title: Online conference on chemistry at Nahata College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.