आॅनलाईन सातबाराचा डाटा नष्ट

By admin | Published: February 22, 2017 12:23 AM2017-02-22T00:23:16+5:302017-02-22T00:23:16+5:30

तलाठ्यांच्या मेहनतीवर फेरले पाणी : शेतकºयांचे प्रचंड नुकसान

Online data loss of online data | आॅनलाईन सातबाराचा डाटा नष्ट

आॅनलाईन सातबाराचा डाटा नष्ट

Next

हिंगोणा : जळगाव जिल्हा सर्व्हअरचा वेग वाढविण्यासाठी  ३० जानेवारी ते ७ फेब्रुवारी या दरम्यान, जिल्ह्यातील  तलाठी यांचे आॅनलाईनचे काम बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर आॅनलाईनचे काम सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा तलाठी व शेतकरी यांना होती. परंतु खोदा पहाड निकला चुंहा  या म्हणीप्रमाणे प्रणालीचा वेग वाढला नाही परंतु प्रणालीतील मागील काही दिवसांचा डाटा नष्ट झाल्याचे आढळून आले.त्यामुळे प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.    आॅनलाईन सातबारा सर्वेअर मंद गतीने चालत होते. त्याचा  वेग वाढण्याबाबत जिल्हाधिकारी व तलाठी संघ यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्याला नवीन सर्व्हर देण्यात आले. नवीन सर्व्हर  दिल्यानंतर काहीही फायदा झाला नाही. पूर्वीपेक्षा वेग मंदावला, ३०.१.२०१७ ते २.२.२०१७ आॅनलाीन प्रणाली पूर्णपणे बंद पडली. साधा ७/१२ निघण्यासाठी १३ ते १४ मिनिट कालावधी लागतो, संगणकात फेरफार होण्यासाठी  तासापेक्षाही जास्त वेळ लागत आहे, जनतेची कामे जलदगतीने होण्याऐवजी मंदगतीने होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.हे सर्व होत  असतानाच आज  २१ रोजी   जिल्ह्यातील सर्व गावांचा प्रणातील मागील आठ ते १५ दिवसांपूर्वी तलाठी  यांनी रात्रंदिवस बसून फिड केलेला डाटा नष्ट झाल्याचे आढळून आले आहे.यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.तलाठी यांनी प्रणालीत घेतलेल्या नोंदी आढळत नाही.   मंडळ अधिकारी यांनी प्रणालीत केलेले फेरफार सापडत नाही. त्यामुळे आज ज्या शेतकºयांनी तलाठी कार्यालयातून ७/१२ घेतले त्यातील काही शेतकरी ७/१२ बघून आवाक झाले. कारण ७/१२ उताºयावर फेरफार झालेला नव्हता. यामुळे प्रशासनाने या बाबत तत्काळ लक्ष घालून डाटा पूर्ववत करावा, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.यानिमित्त  शेतकºयांचा तलाठी कार्यालय व परिणामी महसूल प्रशासनावर  रोष निर्माण होत आहे. प्रकल्पात सुधारणा होण्यासाठी तलाठी संघाने दोन वेळा आंदोलन केले. लोकप्रतिनिधी या नात्याने विविध आमदारांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा झाली तरी सुद्धा राज्यशासन निद्रा अवस्थेतच आहे. (वार्ताहर)
आॅन लाईन  ७/१२ डाटा नष्ठ होणे ही बाब अतिशय क्लेशदायक आहे. आता पुन्हा नव्याने तलाठी वर्गाला काम करावे लागणार आहे.आधीच निवडणूक कामाचा ताण सहन करुन तलाठी वर्गाने जिवापाड मेहनत घेऊन सातबाराच्या नोंदी केल्या. 
    - एन.आर.ठाकूर, तलाठी, संघटना, जिल्हाध्यक्ष, जळगाव.
आज   लॉग इन केले असता हिंगोणे गावाच्या ८१२९ ते ८१४० पर्यंतच्या फेरफार नोंदीनष्ट झाल्याचे आढळून आले. असाच अनुभव जिल्ह्यातील इतर तलाठी व मंडळ अधिकारी यांना आला.  ही बाब शासनाने गांभीर्याने घेणे गरजेची आहे
    - जे.डी.बेहाळे, तलाठी, हिंगोणा
 आॅनलाईन ७/१२ डाटा नष्ट झाल्याने शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.  शासनाने त्वरित लक्ष द्याव.
    - सागर राजेंद्र महाजन, शेतकरी

Web Title: Online data loss of online data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.