बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवीत तरुणाची ऑनलाइन फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:15 AM2021-03-21T04:15:31+5:302021-03-21T04:15:31+5:30

जळगाव : बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवीत महाबळ येथील मंजित प्रल्हाद जांगीड या तरुणाची ६४ हजार रुपयांची ...

Online fraud of a youth showing the lure of getting a job in a bank | बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवीत तरुणाची ऑनलाइन फसवणूक

बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवीत तरुणाची ऑनलाइन फसवणूक

Next

जळगाव : बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवीत महाबळ येथील मंजित प्रल्हाद जांगीड या तरुणाची ६४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीला आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंजित प्रल्हाद जांगीड हा तरुण महाबळ कॉलनी परिसरातील विद्युतनगरात कुटुंबासह वास्तव्यास आहे. २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२१ दरम्यान काही अनोळखी नंबरवरून आणि ई-मेल आयडीमार्फत एचडीएफसी बँकेचे नाव लोगो असलेली बनावट कागदपत्रे पाठवून मंजित जांगीड याला एचडीएफसी बँकेत नोकरी देण्याचे आमिष दाखविले. भावना विकास जैन, अनन्या गुप्ता आणि स्वाती शर्मा असे बनावट नाव सांगून तिघांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये मंजितकडून सुमारे ६४ हजार ५७४ रुपये आर्थिक लाभासाठी ऑनलाइन टाकण्यास सांगितले. त्यानुसार मंजितने ऑनलाइन पद्धतीने ६४ हजार ५७४ रुपये टाकले. दरम्यान, पैसे पाठवून नोकरी मिळाली नसल्याने आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मंजितने तातडीने सायबर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली व पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना माहिती कथन केली. त्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहेत.

Web Title: Online fraud of a youth showing the lure of getting a job in a bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.