ऑलनाईन रोजगार मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:15 AM2021-03-22T04:15:12+5:302021-03-22T04:15:12+5:30

योजनांसाठी अर्ज जळगाव : कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी महाडीबीटी फार्मर पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी शेवटची ...

Online job fair | ऑलनाईन रोजगार मेळावा

ऑलनाईन रोजगार मेळावा

Next

योजनांसाठी अर्ज

जळगाव : कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी महाडीबीटी फार्मर पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी शेवटची संधी उपलब्ध करुन देण्यात आली असून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २०२१-२२ या वर्षाकरिता अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

चाचणी परीक्षा १६ मे रोजी

जळगाव : केंद्र सरकार संचालित जवाहर नवोदय विद्यालय साकेगाव (भुसावळ) येथील इयत्ता सहावीच्या २०२१-२२ प्रवेशा करीता होणारी निवड चाचणी परीक्षा १० एप्रिल ऐवजी १६ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सर्व संबधीत मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, अध्यापक, पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर. खंडारे यांनी केले आहे.

शिष्यवृत्तीसाठी अर्ज

जळगाव : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेचे अर्ज भरण्याकरिता महाडीबीटी हे ऑनलाईन पोर्टल ३ डिसेंबर २०२० पासून सुरु झाले आहे. तथापी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अद्यापपर्यंत अनु.जाती प्रवर्गाचे ६६ टक्के तर विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गाचे ६९ टक्के अर्ज भरण्यात आलेले आहेत. सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज तत्काळ भरण्यात यावेत तसेच महाविद्यालयाच्या लॉग-इन वर प्रलंबित असलेले अर्ज त्वरित पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Online job fair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.