विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी डॉ़ प्रदीप जोशींचे आॅनलाईन व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 07:57 PM2020-05-21T19:57:24+5:302020-05-21T19:57:37+5:30
जळगाव : कोरोनो विषाणूच्या प्रादुभार्वामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत व लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी ...
जळगाव : कोरोनो विषाणूच्या प्रादुभार्वामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत व लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने जळगाव शहरातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ़ प्रदीप जोशी यांचे आॅनलाईन व्याखान विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी काहीसे चलबिचल झाले आहेत. त्यांचे मानसिक आरोग्य या काळात उत्तम राहावे या हेतूने कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाने मानसोपचार तज्ज्ञ डॉ़ प्रदीप जोशी यांचे आॅनलाईन व्याख्यान विद्यापीठाच्या संकेत स्थळावरावर उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य ; कोरोना दरम्यान व नंतर या विषयावर डॉ़जोशी यांनी संवाद साधला असून विद्यार्थ्यांनी या आॅनलाईन व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. ए. बी. चौधरी व जनसंपर्क अधिकारी डॉ़ सुनील पाटील यांनी केले आहे.