रावेर येथे ऑनलाइन व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:21 AM2021-08-12T04:21:20+5:302021-08-12T04:21:20+5:30
रावेर : आधुनिकता स्वीकारताना संशोधनातून आदिम भाषा, संस्कृतीचे तथा आदिवासी जीवनशैली व तत्त्वांचे संवर्धन करणे व नवशिक्षित आदिवासी बांधवांनी ...
रावेर : आधुनिकता स्वीकारताना संशोधनातून आदिम भाषा, संस्कृतीचे तथा आदिवासी जीवनशैली व तत्त्वांचे संवर्धन करणे व नवशिक्षित आदिवासी बांधवांनी अतिप्राचीन आदिवासी संस्कृतीचा अभिमान बाळगणे ही काळाची गरज असल्याचे मत पुणे येथील व्याख्याते प्रा. डॉ. हनुमंत भवारी यांनी व्यक्त केले.
येथील व्ही. एस. नाईक महाविद्यालयात आदिवासी दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. हा कार्यक्रम ऑनलाइन घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. व्ही. दलाल होते. उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. सूर्यवंशी, नॅक समन्वयक डॉ. एस. आर. चौधरी यांच्या हस्ते महानायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रा. डॉ. जी. आर. ढेंबरे यांनी प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन प्रा. एस. डी. धापसे यांनी केले. आभार प्रा. एस .बी. धनले यांनी मानले. कार्यक्रमात तांत्रिक साहाय्य डॉ. बी. जी. मुख्यदल व प्रा सी. पी. गाडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. जी. आर. ढेंबरे, प्रा. एस. बी. गव्हाड, प्रा. उमेश पाटील, प्रा. एन.ए. घुले यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी शिक्षकेतर कर्मचारी युवराज बिरपण, सुनील मेढे ,एस.के. महाजन, सतीश वाघ, माया अग्रवाल यांनी परिश्रम घेतले.