शेतक:यांना ऑनलाइन मार्केटिंग सुविधा
By Admin | Published: February 4, 2016 12:19 AM2016-02-04T00:19:50+5:302016-02-04T00:19:50+5:30
चंद्रकांत पाटील यांची घोषणा : सर्व बाजार समित्यांमध्ये कोल्ड स्टोरेज
दोंडाईचा, जि.धुळे : राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतक:यांना ऑनलाइन मार्केटिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. याशिवाय अपेक्षित भाव मिळेर्पयत शेतक:याचा माल सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व बाजार समित्यांमध्ये कोल्ड स्टोरेज निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सहकार, पणन व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथील बाजार समितीत आयोजित शेतकरी मेळाव्यात केली. दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी सकाळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दादासाहेब रावल व्यापारी संकुलाचे उद्घाटन आणि दादासाहेब रावल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ.सुभाष भामरे तर प्रमुख पाहुणे म्हणून सरकारसाहेब रावल, आमदार जयकुमार रावल, माजी आमदार बापूसाहेब रावल, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी आदी उपस्थित होते. बाजार समितीत निर्माण करण्यात येणा:या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेल्या शेतीमालावर शेतक:यांना 75 टक्के रक्कम आगाऊ दिली जाईल. नंतर मालाला योग्य भाव मिळाल्यावर शेतक:याला उर्वरित रक्कम मिळेल, अशा स्वरूपाची शेतकरी हिताची उत्कृष्ट योजना शासन तयार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.