दोन वर्षात ८५ जणांना आॅनलाईन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:00 PM2020-02-10T12:00:37+5:302020-02-10T12:01:30+5:30

सुनील पाटील । जळगाव : तंत्रज्ञानात जशी दिवसागिणक भर पडत आहे, अगदी त्याच पध्दतीने याच तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आॅनलाईन ...

Online sewing for 2 people in two years | दोन वर्षात ८५ जणांना आॅनलाईन गंडा

दोन वर्षात ८५ जणांना आॅनलाईन गंडा

Next
ठळक मुद्दे सायबर क्राईम ५ लाख ४० हजाराचा मुद्देमाल वसूल२९ गुन्ह्यांमध्ये आरोपी निष्पन्नपरप्रांतीय आरोपी सापडेना

सुनील पाटील ।
जळगाव : तंत्रज्ञानात जशी दिवसागिणक भर पडत आहे, अगदी त्याच पध्दतीने याच तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आॅनलाईन फसवणूक असो की गंडा घालणे याचे प्रकार अधिक वाढत चालले आहेत. २०१८ ते २०१९ या दोन वर्षात सायबर पोलिसांकडे आॅनलाईन फसवणुकीचे ८५ गुन्हे दाखल झाले असून त्यातील फक्त २९ गुन्हे उघडकीस आले आहेत. ५६ गुन्हे अद्यापही प्रलंबित आहेत. सर्वच गुन्ह्यांमधील आरोपी परप्रांतीय असल्याने तपासात अडचणी निर्माण होत आहेत.
जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशनची निर्मिती झाल्यापासून कागदोपत्री ८५ गुन्हे दाखल झाले आहेत. प्रत्यक्षात असे अनेक गुन्हे घडले आहेत, की त्याची नोंद झालेली नाही. मात्र काही प्रकरणात तक्रार अर्जावरच तक्रारदाराला रक्कम परत मिळाल्याने गुन्हे दाखल झालेले नाहीत.

२१ सप्टेबर २०१८ ला पहिला गुन्हा
तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळात १५ आॅगस्ट २०१७ रोजी सायबर लॅबची निर्मिती झाली. तत्कालिन पालकमंत्री स्व.पांडूरंग फुंडकर यांच्याहस्ते या लॅबचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर या लॅबचे सायबर पोलीस ठाण्यात निर्मिती झाली. जळगावला पहिला गुन्ह २१ सप्टेबर २०१८ रोजी दाखल झाला.

टॉप टेन गुन्हे उघड
पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी सर्वात जास्त सायबर गुन्ह्यांवर फोकस केले. दाखल झालेले गुन्ह्यापासून बोध घेऊन भविष्यात तसे गुन्हे घडूच नये यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व जनजागृतीवर अधिक भर दिला. पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अंगत नेमाणे यांच्या पथकाने सर्वात महत्वाचे दहा गुन्हे उघडकीस आणून परिक्षेत्रात एक स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे या पथकाने आॅनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात ४ लाख १५ हजार ८०३ रुपये रोख स्वरुपात वसूल करुन तक्रारदाराला ती रक्कम मिळवून दिली आहे. त्याशिवाय एका गुन्ह्यात १ लाख २४ हजार ९०० रुपये किमतीचा मोबाईलही परप्रांतातून ताब्यात घेतला आहे.

आरोपी परप्रांतीय असल्याने अडचणी
सायबरच्या गुन्ह्यात जवळपास सर्वच आरोपी हे उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, नोएडा व राजस्थान याच भागातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर परप्रांतात जायचे असेल तर वरिष्ठांची परवानगी व इतर गुन्ह्यांच्या तपासात समन्वय राखण्यात यंत्रणेला कमालीची कसरत करावी लागते, परिणामी त्याचा फायदा आरोपींना होतो, मात्र जळगाव सायबर पोलिसांनी त्यावर मात करुन अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले. बिहार राज्यातील मनिकांत पांडे, शैलेश पांडे (रा.चिकनीगाठी, मोतीहारी, चंपारण) यांच्याकडून ३६ हजार ९०३ रुपये हस्तगत करण्यात यश आले. भुसावळ येथील सदानंद पुंडलिक बºहाटे यांना एटीएम कार्डचा क्रमांक विचारुन ४६ हजार ९९७ रुपयात गंडा घालण्यात आला होता. त्याशिवाय सागर राजेश बत्रा यांना ३ लाख ३२ हजार रुपयात आॅनलाईन गंडा घालण्यात आला होता. पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणून सुमन कुमार, अजय कुमार व नितीश कुमार (रा.नालंदा, बिहार) यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसूल केली आहे.

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण अलीकडे वाढायला लागले आहेत. असे गुन्हे करणारे आरोपी बहुतांश परप्रांतीय आहेत. त्यामुळे तपासाला जाताना अडचणी येतात व त्याचा फायदा आरोपींना होतो. या गुन्ह्यातील आरोपी ओळख लपवून वावरतात. तरीही महत्वाचे दहा गुन्हे उघडकीस आणण्यात आम्हाला यश आले आहे.
-बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक, सायबर

Web Title: Online sewing for 2 people in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.