पेरणीबाबत शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:12 AM2021-06-01T04:12:27+5:302021-06-01T04:12:27+5:30
डॉ. हेमंत बाहेती यांनी सध्या परिस्थितीमध्ये खरीप हंगामाचे नियोजन करण्यासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करणे व बीज प्रक्रिया ...
डॉ. हेमंत बाहेती यांनी सध्या परिस्थितीमध्ये खरीप हंगामाचे नियोजन करण्यासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करणे व बीज प्रक्रिया यासारख्या गोष्टी जास्त उत्पादनासाठी फायदेशीर आहेत, असे सांगितले. पारोळा तालुक्यामध्ये हलकी जमीन व माध्यम पाऊस असल्यामुळे पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा, असे सांगितले.
जाधवर, डॉ. विशाल वैरागर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. सोबतच शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण कार्यक्रम व त्याचा उद्देश सांगितला. इंजिनिअर वैभव सूर्यवंशी यांनी रुंद सरी वरंबा पद्धत याविषयी सादरीकरण केले. जळगाव जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करून कमी पावसाच्या व अति पावसाच्या परिस्थितीमध्ये शाश्वत उत्पन्न घेतले आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान केले. डॉक्टर स्वाती कदम विषयतज्ज्ञ कृषी विद्या यांनी बीज प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी व त्याचे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये तालुक्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी व ४३ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी आरती साळी यांनी केले व आभार कृषी सहायक भामरे यांनी मानले.