अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या निवडणूक प्रक्रियेवर चोपडा महाविद्यालयात ऑनलाईन वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 02:17 PM2020-11-12T14:17:12+5:302020-11-12T14:17:58+5:30
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातर्फे ह्यअमेरिकन राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया - स्वरूप व परिचयह्ण या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले होते.
चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातर्फे ह्यअमेरिकन राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया - स्वरूप व परिचयह्ण या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले होते.
अमेरिकेतील राष्ट्रपती पदासाठीची मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक प्रक्रिया- स्वरूप व परिचय विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना परिचय व्हावा या उद्देशाने प्रस्तूत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले होते. या वेबिनारच्या अध्यक्षस्थानीउपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे हे ऑनलाईन उपस्थित होते. या वेबिनारचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख सहायक प्रा.डी.डी.कर्दपवार यांनी केले.
या वेबिनारप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ.विजय तुंटे म्हणाले की, ह्यअमेरिकेची राज्यघटना जगातील सर्वात लहान राज्यघटना असून अमेरिकेतील राज्यघटनेत अमेरिकन राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया विस्तृतपणे मांडण्यात आलेली आहे. याप्रसंगी त्यांनी अमेरिकेची निवडणूक प्रक्रियेची पार्श्वभूमी सांगून अमेरिकन राष्ट्रपती पदाची निवडणूक प्रक्रिया, त्याची पार्श्वभूमी व स्वरूप याची अतिशय सखोल पद्धतीने माहिती दिली. तसेच सद्यस्थितीत सुरू असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प व डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांच्यातील लढतीची सविस्तर विवेचन करून प्रक्रियेतील गुण व दोषदेखील सांगितले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
आभार सहायक प्रा.विशाल पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक प्रा. एम.एल.भुसारे व राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.