धनाजी नाना महाविद्यालयात ऑनलाइन वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:44+5:302021-06-11T04:11:44+5:30
यावेळी डॉ. जगताप यांनी सांगितले की, आमच्या महाविद्यालयात ‘लैंगिक अत्याचार समिती’ कार्यरत आहे, तसेच मुलींच्या बाबतीत जवळचीच व्यक्ती जास्त ...
यावेळी डॉ. जगताप यांनी सांगितले की, आमच्या महाविद्यालयात ‘लैंगिक अत्याचार समिती’ कार्यरत आहे, तसेच मुलींच्या बाबतीत जवळचीच व्यक्ती जास्त त्रासदायक ठरते. मुलींनी थोडं धाडस दाखवलं तर काही प्रसंग टळतील. प्रमुख वक्त्या ॲड. क्रांतीकुमार रोटे (मेंबर ऑफ लीगल ॲडव्हायझर सर्व्हिस कल्याण कोर्ट, मुंबई) या होत्या. त्यांनी लैंगिक अत्याचार कसा होतो हे सांगितले. स्त्रियांना जाणूनबुजून मारलेला धक्का व चुकून मारलेला धक्का समजतो. कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, लैंगिक अत्याचार यासंबंधीच्या विविध कायद्यांची माहिती दिली. लॉकडाऊनमध्ये सेक्सुअल हरॅशमेंटचे प्रकार वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. बदल स्वतःमध्ये घडवा हे नमूद केले. प्रास्ताविक डॉ. कल्पना पाटील यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, उपप्राचार्य डॉ. अनिल भंगाळे प्रा. अनिल सरोदे, प्रा. डी. बी. तायडे यांनी शुभेच्छा दिल्या. डॉ. ताराचंद सावसाकळे, डॉ. सीमा बारी, डॉ. सविता वाघमारे, डॉ. सरला तडवी, डॉ. जयश्री पाटील, प्रा. जयश्री सरोदे, प्रा. नाहीदा कुरेशी आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार डॉ. सीमा बारी यांनी मानले.