शैक्षणिक धोरणावर विद्यापीठातर्फे गुरूवारी ऑनलाईन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 08:28 PM2020-09-23T20:28:03+5:302020-09-23T20:28:19+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शौक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन ...
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शौक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय शौक्षणिक धोरण २०२०च्या अनुषंगाने शौक्षणिक घटकांशी संबंधितांकडून अभिप्राय , सूचना उच्च शिक्षण संचालकांनी मागविल्या आहेत. त्यादृष्टिने विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, अधिष्ठाता मंडळ, अभ्यास मंडळांचे सदस्य, संस्थाचालक, पदाधिकारी, प्राचार्य, विभागप्रमुख, संचालक तसेच विद्यापीठाशी संबंधित घटक यांच्यासाठी गुरुवारी दुपारी ३३० वाजता ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, जळगाव विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक प्रा.सतीश देशपांडे हे मार्गदर्शन करणार आहेत. या राष्ट्रीय शौक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी आराखडयाची प्रत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विहीत नमुन्यात देण्यात आली असून शौक्षणिक क्षेत्राशी संबंधित घटकांनी यासंदर्भातील आपल्या सूचना व अभिप्राय २५ सप्टेंबर पर्यंत स्र५ू@ल्ले४.ंू.्रल्ल या ईमेलवर पाठवाव्यात असे आवाहन प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी केले आहे.