चोपडा येथे ऑनलाइन योग शिबिर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:12 AM2021-06-20T04:12:29+5:302021-06-20T04:12:29+5:30
चोपडा : येथील पंकज विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शनिवारपासून ऑनलाइन योग शिबिर सुरू झाले. २१ जूनपर्यत ते चालेल. ...
चोपडा : येथील पंकज विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शनिवारपासून ऑनलाइन योग शिबिर सुरू झाले. २१ जूनपर्यत ते चालेल.
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत संस्थेतील सर्वांचे आरोग्य सुदृढ रहावे या हेतूने संस्था संचालक पंकज बोरोले यांनी सूचित केले. त्यानुसार पंकज महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर पाठक, मुख्याध्यापक व्ही.आर.पाटील यांनी झूम ॲपच्या साहाय्याने योग शिबिराचे नियोजन केले.
या शिबिरासाठी जळगाव योग असोसिएशनच्या उपाध्यक्षा ॲड.स्वाती निकम या योग प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करत आहेत. यात विविध योगासनांचे प्रात्यक्षिक योग प्रशिक्षक ॲड.स्वाती निकम सर्वांकडून करून घेत आहेत. दरवर्षी संस्थेचे विविध विभागातील ४ हजार ५०० विद्यार्थी या योग शिबिरात सहभागी होत असत, परंतु या वर्षीही कोरोनामुळे विद्यार्थी सहभाग असणार नाही, मात्र ऑनलाइन योग शिबिरात सहभागी होता येणार आहे.
या तीन दिवसीय शिबिरास संस्थाध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले आणि सर्व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शिबिर यशस्वीतेसाठी क्रीडा संचालक डॉ. विजय पाटील, डॉ. एस.के. पाटील हे तांत्रिक साहाय्य करत असून संस्थेतील सर्व विभागप्रमुख यांचे सहकार्य लाभले आहे.