उद्यापासून ऑनलाइन योग शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:41+5:302021-07-07T04:20:41+5:30

———————————————————— २२ एचआयव्ही रुग्णांना रोटरी वेस्टतर्फे लसीकरण जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या व्होकेशनल कमिटीतर्फे जाणीव बहुउद्देशीय संस्थेतील ...

Online yoga camp from tomorrow | उद्यापासून ऑनलाइन योग शिबिर

उद्यापासून ऑनलाइन योग शिबिर

Next

————————————————————

२२ एचआयव्ही रुग्णांना रोटरी वेस्टतर्फे लसीकरण

जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या व्होकेशनल कमिटीतर्फे जाणीव बहुउद्देशीय संस्थेतील एचआयव्ही २२ रुग्णांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. रोटरी वेस्टचे अध्यक्ष कृष्णकुमार वाणी, सचिव अनुप असावा, सुनील सुखवानी, प्रकल्प प्रमुख सरिता खाचणे, महेश सोनी, संदीप भोळे, चेतन गांधी, गौरव सफळे, प्रेमलतासिंग, अमित मुथा, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. रवी हिराणी व जाणीव बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनीषा बागुल, सचिव प्रवीण पाटील उपस्थित होते.

————————————————————

नशिराबाद शाळेत ऑनलाइन योग शिबिर सुरू

फोटो क्रमांक ०७ सीटीआर २०

नशिराबाद : न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरद्वारे आयोजित निःशुल्क ऑनलाइन योग शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरास संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, मुख्याध्यापक प्रवीण महाजन, सोहम् डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथीची विद्यार्थिनी प्रीती महाजन उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याने त्यादृष्टीने योगेश पाटील व सर्व संचालकांच्या प्रयत्नातून या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्याध्यापक प्रवीण महाजन यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षक प्रीती महाजन यांनी योगाबद्दल माहिती दिली. या शिबिरात ६७ शिक्षक, विद्यार्थी, पालक सहभागी झाले होते. सुनीता न्हावी यांनी नियोजन केले. सूत्रसंचालन शीतल चावरे यांनी केले तर शिल्पा पाठक यांनी आभार मानले.

Web Title: Online yoga camp from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.