ग्रामीण भागात १४७ रुग्णालयांचीच नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:12 AM2021-01-10T04:12:31+5:302021-01-10T04:12:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : खासगी रुग्णालयांना बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार जिल्हा आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषदेच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : खासगी रुग्णालयांना बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार जिल्हा आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून मात्र, ग्रामीण भागातील केवळ १४७ रुग्णालयांचीच नोंदणी झाली असून यात तालुकास्तरावर आणि जळगाव शहरात असे एकूण ९५३ खासगी रुग्णालये नोंदणीकृत आहे. ही संख्या कमी आहे. ज्यांनी नोंदणी केली नाही ते केवळ ओपीडी तत्तावर रुग्णालये चालवत असतील अशीही माहिती काहींनी दिली आहे. दरम्यान, नोंदणीसाठीचे अनेक निषक पूर्ण न होत असल्याने ही नोंदणी केली जात नसल्याचे चित्र आहे. मात्र, बोगस डॉक्टरांच्या कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
तीन ठिकाणाी नोंदणी
ग्रामीण भागातील रुग्णालयांची नोंदणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे असून यात तालुकानिहाय स्वतंत्र उल्लेख नाही. तालुकास्तरावरील खासगी रुग्णालयाची नोंदणी ही जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे असून महापालिकेच्या हद्दीतील खासगी रुग्णालयांची नोंदणी ही महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे केली जाते. एकत्रीत नोंद नसल्याने काहीसे प्रशासकीय समन्वयात गोंधळाचे वातावरणही असून किती रुग्णालये बेकायदेशीर आहेत. याकडेच दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षात किती नोंदणी झाली ?
जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या वर्षभरात वर्षभरात ग्रामीण भागात पाच नव्या रुग्णालयांची नोंदणी झाली आहे. वर्षभरापूर्वी १४३ रुग्णांलयांची या ॲक्टनुसार नोंदणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून ग्रामीण भागात १४७ नोंदणी आहेत.
नोंदणी न केल्यास होणारी कारवाई...
बॉम्बे नर्सिंग ॲक्ट अंतर्गत रुग्णालयांना नोंदणी करणे बंधनकारक आहे. याचे निकष असून या अंतर्गत जी रुग्णालये नोंदणी करीत नाहीत त्यांच्यावर कठेार कारवाई होऊ शकते. यात त्यांचा परवाना रद्द होऊ शकतो, त्यांना काळ्या यादीत टाकले जाऊ शकते. तालुकास्तरावरील ५०४ रुग्णालयांची नोंदणी झालेली आहे. डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक