शिक्षक पुरस्कारांसाठी केवळ १८ प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 01:05 PM2017-08-23T13:05:04+5:302017-08-23T13:07:24+5:30
जिल्हा परिषदेकडून गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक पुरस्कार देण्यात येतात. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील १५ शिक्षकांना हे पुरस्कार देण्यात येतात, मात्र यंदा १५ शिक्षक पुरस्कारांसाठी जिल्ह्यातून केवळ १८ प्रस्ताव आले आहेत. पुरस्कारांसाठी शिक्षकांना एक महिन्याची वेतनवाढ रद्द करण्यात आल्याने व पुरस्काराची रक्कम कमी असल्याने जिल्ह्यातील शिक्षकांनी या पुरस्कारांकडे पाठ फिरविली आहे.
आॅनलाईन लोकमत,
जळगाव-दि.२३,जिल्हा परिषदेकडून गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक पुरस्कार देण्यात येतात. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील १५ शिक्षकांना हे पुरस्कार देण्यात येतात, मात्र यंदा १५ शिक्षक पुरस्कारांसाठी जिल्ह्यातून केवळ १८ प्रस्ताव आले आहेत. पुरस्कारांसाठी शिक्षकांना एक महिन्याची वेतनवाढ रद्द करण्यात आल्याने व पुरस्काराची रक्कम कमी असल्याने जिल्ह्यातील शिक्षकांनी या पुरस्कारांकडे पाठ फिरविली आहे.
जिल्हा परिषदेकडून शिक्षक दिनानिमित्त शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी चांगले उपक्रम राबविणाºया शिक्षकांना शिक्षक पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार जिल्हा परिषदेने २०११ पासून बंद केले होते. मात्र २०१५ मध्ये तत्कालीन जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी आस्तिकु मार पांडेय यांनी हे पुरस्कार सुरु केले होते. २०१५ मध्ये जिल्ह्यातील ३० ते ३५ शिक्षकांनी या पुरस्कारांसाठी अर्ज केले होते. मात्र यावर्षी केवळ १८ शिक्षकांनी पुरस्कारासाठी अर्ज दाखल केले आहेत.
पुरस्कारातुन ‘आदर्श’ नावही काढले
आधी आदर्श शिक्षक पुरस्कारनावाने हे पुरस्कार दिले जात होते. मात्र या पुरस्कारातुन ‘आदर्श’ नाव देखील काढण्यात आले आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक महिन्याची वेतनवाढ दिली जात होती. मात्र ती वेतनवाढ देखील जि.प.कडून बंद करण्यात आली आहे. यासह पुरस्कार्थींना पुरस्कारासाठी केवळ १ हजार ५०० रुपये दिले जातात. त्यामुळे शिक्षकांनी या पुरस्कारांकडे पाठ फिरविल्याची चर्चा आहे.
पुढील आठवड्यात मुलाखती
जि.प.प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या १८ प्रस्तावांच्या कागदपत्रांची पडताळणी जि.प.कडून मंगळवारी करण्यात आली. तसेच पुढील आठवड्यात २८ व २९ आॅगस्ट रोजी १८ शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. मुलाखत समितीत जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह शिक्षण सभापती पोपट भोळे, प्राथमिक शिक्षण अधिकारी, माध्यमिक शिक्षण अधिकारी आदी आहेत. ५ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असल्याने ६ सप्टेंबर रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.