चाळीसगाव वनक्षेत्रातील नऊ हजार हेक्टरासाठी अवघे २० कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 07:13 PM2017-11-23T19:13:53+5:302017-11-23T19:18:22+5:30

गेल्या चार महिन्यात नरभक्षक बिबट्याने चार मानवी बळी तर अनेक जनावरांचा फडशा पाडला.

Only 20 employees for nine thousand hectare in Chalisgaon forest area | चाळीसगाव वनक्षेत्रातील नऊ हजार हेक्टरासाठी अवघे २० कर्मचारी

चाळीसगाव वनक्षेत्रातील नऊ हजार हेक्टरासाठी अवघे २० कर्मचारी

Next
ठळक मुद्देनऊ हजार हेक्टर वनक्षेत्राचे एकूण सात बिटअनेक वर्षात सुसूत्रता आणण्यासाठी पुनर्रचना नाही.दोन महिन्यांपूर्वी पिंपरखेड शिवारातून एक बिबट्या जेरबंद

जिजाबराव वाघ / आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि.जळगाव, दि.२३ : चाळीसगाव वनविभागात आॅगस्टमध्ये पहिल्यांदा बिबट्याने डरकाळी फोडून आपण आल्याची वर्दी दिली. यानंतर गेल्या चार महिन्यात नरभक्षक होत त्याने चार मानवी बळी तर अनेक जनावरांचा फडशा पाडला. बिबट्या एक आहे की, अधिक हे कोडे असले तरी तालुक्यातील नऊ हजार वनक्षेत्राचे पहारेकरी म्हणून अवघे २० कर्मचारी आहे. याबरोबरच वनगस्तीसाठी आवश्यक साधने यांचीही वानवा असल्याने पिंजरे लावूनदेखील नरभक्षक बिबट्याने सातत्याने वनविभागाला हुलकावणी देत आहे.
रचना ब्रिटिशकालिन
चाळीसगाव तालुक्यात प्रादेशिक वनविभागाच्या कार्यक्षेत्रात एकूण नऊ हजार वनक्षेत्र आहे. याची रचना ब्रिटिशकालीन आहे. गेल्या अनेक वर्षात त्यात सुसूत्रता आणण्यासाठी पुनर्रचना झालेली नाही. एवढ्या मोठ्या वनक्षेत्रासाठी अवघे २० कर्मचारी आहेत. एक चारचाकी वाहन, चार पिस्तूल आहेत. अद्ययावत साधनांचाही खडखडाट आहे. याच वनक्षेत्राला लागून वन्यजीव विभाग व गौताळा अभयारण्याच्या सीमारेषा जोडल्या गेल्या आहेत. साहजिकच हिस्र प्राणी प्रादेशिक वनविभागात सहज प्रवेश करतात. चाळीसगाव वन्यजीव विभागाने केलेल्या प्राणीगणनेत याभागात बिबटे असल्याची नोंद यापूर्वीच केलेली आहे.
वनक्षेत्रात सात विभाग
नऊ हजार वनक्षेत्राचे एकूण सात विभाग केले असले तरी त्याच्या सीमा मोठ्या आहेत. यात सुसूत्रता आणण्यासाठी याचे किमान १५ बीट व्हावे, असे वनप्रेमी व वन्यजीव रक्षकांचे म्हणणे आहे. यामुळे कर्मचारी संख्याही वाढेल.
उपखेड बिटमध्ये तालुक्यातील १०८ गावांपैकी ८० गावांलगतचे वनक्षेत्र येते. एवढ्या मोठ्या वनक्षेत्रासाठी वनपालदेखील नाही. घोडेगाव बिटच्या वनपालांकडे याचा पदभार आहे.बिबट्याने उपखेड वनक्षेत्रातच मोठा उच्छांद मांडला आहे.जे चार मानवी बळी बिबट्याने घेतले तेही याच विभागातील गावांमधील आहे.
सात बिट, २० कर्मचारी
नऊ हजार हेक्टर वनक्षेत्राचे एकूण सात बिट करण्यात आले आहेत. यात जंगल सुरक्षेसाठी एक प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी, सात बिटगार्ड, दोन वनपाल, १० वनमजूर असे एकूण २१ कर्मचारी असून ही संख्या तोडकी आहे.

 नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी एकूण सात पिंजरे लावले आहेत. दोन शूटर्स, एक ड्रोन कॅमेरा, चाळीसगाव, पारोळा, पाचोरा वनविभागातील ४० कर्मचारी वनगस्त घालीत आहोत. दोन महिन्यांपूर्वी पिंपरखेड शिवारात एका बिबट्याला आम्ही जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
- संजय मोरे, वनपरिक्षेत्र अधिकार, प्रादेशिक वनविभाग, चाळीसगाव

 वनक्षेत्रांची पुनर्रचना ही एक ज्वलंत समस्या आहे. लहान बिटात विभागणी केल्यास चांगले परिणाम दिसून येतील. अपूर्ण मनुष्यबळ, नियमित प्रशिक्षणे याचाही अभाव आहे. वनगस्तीसाठी अद्ययावत साधानेही पुरवली जात नाही. जंगलात प्राण्यांसाठी अन्नसाखळी वाढविण्यासाठी प्रायोगिक कामदेखील झाले पाहिजे.
- राजेश ठोंबरे, वन्यजीव रक्षक व सर्पमित्र, चाळीसगाव.

Web Title: Only 20 employees for nine thousand hectare in Chalisgaon forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.