परप्रांतीय कामगार उरले फक्त २५ टक्केच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:15 AM2021-04-18T04:15:24+5:302021-04-18T04:15:24+5:30
चटई उद्योग १५० दाल उद्योग ७० मोठे उद्योग १८ अत्यावश्यक उद्योग ६०० परप्रांतीय कामगार उरले फक्त २५ टक्केच औद्योगिक ...
चटई उद्योग १५०
दाल उद्योग ७०
मोठे उद्योग १८
अत्यावश्यक उद्योग ६००
परप्रांतीय कामगार उरले फक्त २५ टक्केच
औद्योगिक वसाहतीत सध्या ६५ ते ७० दालमिल आहेत. त्यात जवळपास १ हजारापेक्षा जास्त कामगार कार्यरत आहेत. हे सर्व कामगार होळीसाठी गावी परतले होते. मात्र त्यातील २५ ते ३० टक्के कामगार आता पुन्हा कामावर आले आहेत. तर उरलेले कामगार परतण्यास तयार नसल्याचे चित्र आहेत. जे कामगार सध्या हजर आहेत तेदेखील कडक निर्बंधांमुळे गावी परतण्याची तयारी करत आहेत. त्यांना सांभाळून ठेवण्यासाठी उद्योजकांनाच प्रयत्न करावे लागत आहेत.
कोट - होळीसाठी गावी गेलेले बहुतांश कामगार अजून परतलेले नाहीत. तसेच ५० टक्के क्षमतेने उद्योग चालवावा लागत असल्याने उत्पादनदेखील कमी आहे. त्याचा मोठा फटका उद्योजकांना बसत आहे.
- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन