जळगाव जिल्ह्यात १५ तालुक्यांसाठी केवळ ३ अन्न सुरक्षा अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 11:57 AM2018-11-03T11:57:37+5:302018-11-03T11:58:20+5:30

‘एफडीए’कडे स्वत:चे वाहनदेखील नाही

Only 3 Food Security Officers for 15 Talukas in Jalgaon District | जळगाव जिल्ह्यात १५ तालुक्यांसाठी केवळ ३ अन्न सुरक्षा अधिकारी

जळगाव जिल्ह्यात १५ तालुक्यांसाठी केवळ ३ अन्न सुरक्षा अधिकारी

googlenewsNext
ठळक मुद्दे एकाच नमुना सहायकावर मदार१२० कि.मी. लांबीच्या जिल्ह्यात कसरत

जळगाव : भेसळयुक्त, निकृष्ठ अन्न पदार्थ तसेच गुटख्यास आळा घालून नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागातच रिक्त जागांमुळे कारवाई करताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यात या विभागाकडे स्वत:चे वाहन नसल्याने १२० कि.मी. लांबीच्या जिल्ह्यात कारवाई करताना वेळेवर पोहचणेही कठीण होत आहे. परिणामी गुटखा असो की इतर अवैध व्यावसायिकांचे आयते फावले जात असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या सणासुदीचे दिवस असून या काळात खाद्य पदार्थांमध्ये भेसळ होण्यासह निकृष्ठ पदार्थांचा वापर वाढतो. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागात पुरेसे अधिकारी व कर्मचारी अपेक्षित असताना तेथे रिक्त जागांमुळे अनेक अडचणी येत आहेत.
या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचे ४ पदे मंजूर असताना येथे केवळ तीनच अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. त्यातही एक महिला अधिकारी असल्याने रात्रीच्या वेळी महिला अधिकाºयांना कारवाईसाठी जाणे अवघड होते. या सोबतच कारवाई झाल्यानंतर त्यासाठीदेखील एकच नमुना सहायक असल्याने कारवाईनंतर पुढील प्रक्रियेत अनेक अडथळे येत असल्याची माहिती मिळाली.
स्वत:चे वाहन नाही
अन्न व औषध प्रशासन विभागाकडे स्वत:चे वाहनदेखील नाही. कोठे माल जप्त केल्यास तो आणताना अनेक अडचणी येतात. १५ तालुके व १२० कि.मी. लांबी असलेल्या जिल्ह्याच्या कोणत्याही कान्या-कोपºयात गुटखा अथवा तर पदार्थ जप्त केल्यास ते गोदामात आणावे कसा, असा प्रश्न निर्माण होते. त्यासाठी खाजगी वाहन भाड्याने घ्यावे लागते तर रात्रीच्यावेळी वाहनदेखील मिळत नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
गुटख्याने गोदाम फुल्ल
गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यात २०च्यावर ठिकाणी कारवाई करण्यात येऊन मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आला आहे. या गुटख्यामुळे गोदाम भरले असून गुटख्याच्या काही गोण्या कार्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेथे मोठी अडचण येत असल्याचेही चित्र आहे.

Web Title: Only 3 Food Security Officers for 15 Talukas in Jalgaon District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.