5 लाखांच्या शहरासाठी फक्त 4 बंब, जळगाव मनपा प्रशासनाची अनास्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:21 PM2018-02-06T13:21:36+5:302018-02-06T13:22:05+5:30
4 पैकी 2 बंबांचा वापर शौचालयांमध्ये पाणी टाकण्यासाठी
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 6 - सुमारे पाच लाख लोकसंख्या असलेल्या जळगाव शहरासाठी फक्त 4 अगिAशमन दलाचे बंब आहेत. त्यापैकी 2 बंबांचा वापर शौचालयांमध्ये पाणी भरण्यासाठी प्रशासनाकडून केला जात आहे. सध्या उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात जळगावात अनेक आगी लागतात, त्या नियंत्रणात आणणे जिकिरीचे जाते. एकीकडे अगिAशमन दलाकडे दीड कोटीचा निधी यऊन पडला आहे, त्याचा विनियोग करण्यात आलेला नाही. 2 फेब्रुवारी रोजी मनपा स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर चार वाहने खरेदी करण्यात येतील, अशी माहिती प्रभारी आयुक्तांनी दिली. मात्र हे नवीन बंब उन्हाळा संपल्यानंतर शहरात दाखल होतील. त्यामुळे आतार्पयत प्रशासन करीत तरी काय होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वर्षभरात 157 आगीच्या घटना
गतवर्षात शहरात आगीच्या तब्बल 157 घटना घडल्या. यात सर्वाधिक 76 आगी उन्हाळ्यात लागल्या. तरीही महापालिकेचा अगिAशमन विभाग सक्षम करण्याबाबत प्रशासनाकडून दुर्लक्षच होत आहे. दोन ते अडीच कोटींचा निधी खर्च करण्यासाठी सदस्यांनी तब्बल तीन वर्षे पाठपुरावा केला तरीही अनेक प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहेत. आजही या विभागाकडे दीड कोटीपेक्षा अधिक निधी पडून आहे.
प्रशासनाची चालढकल
महापालिकेच्या अगिAशमन विभागाबद्दल प्रत्येक महासभा व स्थायी समितीच्या सभेत सदस्य नाराजी व्यक्त करीत असतात. दरवर्षी शासनाकडूनही अगिAशमन विभाग बळकटीकरणासाठी निधी मिळत असतो. गेल्या वर्षी या विभागाकडे सुमारे तीन ते साडेतीन कोटींचा निधी पडून होता. मात्र या विभागाच्या दुर्दशेबाबत प्रशासन गंभीर नव्हतेच.
नवीन केंद्राचे प्रस्ताव थंडबस्त्यात
शहरातील कालिंकामाता मंदिर परिसर व सुरक्षानगर भागात नवीन अगिAशमन केंद्र सुरू करणे प्रस्तावित होते. यासाठी जागाही गेल्या वर्षी निश्चित झाली. मात्र नगररचना विभागाकडे हा प्रस्ताव प्रलंबित आहे. जागेवर आरक्षणाच्या गोंधळामुळे हे काम अद्याप होऊ शकलेले नाही. या भागात आग लागल्यास शहरातून बंब पाठवावे लागतात. तोवर आग लागलेल्या ठिकाणाची राखरांगोळी झालेली असते. त्यामुळे केंद्रांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
पूर्वी 14 बंब, आता फक्त 2
महापालिकेकडे पूर्वी 14 अगिAशमन बंब होते. त्यातील बहुतांश निर्लेखित झाले. ही वाहने अनेक ठिकाणी भंगारमध्ये पडून आहेत. आजच्या स्थितीत महापालिकेकडे केवळ 4 बंब आहेत. त्यातील दोन बंबांचा वापर रोज शौचालयांमध्ये पाणी टाकण्यासाठी प्रशासनाकडून केला जात असतो. गेल्या वर्षी शिल्लक असलेल्या दोन ते अडीच कोटींच्या निधीतून किमान वाहने व विविध साहित्य खरेदी करावे यासाठी नगरसेवक नितीन बरडे, अनंत जोशी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. चार बंब खरेदीचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यात दोन मोठे व दोन लहान अगिAशमन बंब येतील. मात्र त्याला अजूनही तीन ते चार महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.
आठ वर्षानंतर मिळाले 35 लाखांचे साहित्य
अगिAशमन दलातील जवानांकडे साधे ड्रेस नव्हते. तसेच आगीच्या क्षेत्रात जायचे असेल तर आगीचा प्रतिकार करू शकतील असे साहित्य फारसे नव्हते. जानेवारीच्या प्रारंभी हे साहित्य या विभागास मिळाले. तब्बल 8 वर्षानंतर अगिAशमन दलास हे साहित्य प्राप्त झाले.