वर्षभरात फक्त ४७५ विवाहाची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:12 AM2020-12-09T04:12:47+5:302020-12-09T04:12:47+5:30
कोरोनामुळे यंदा धुमधडाक्यात लग्न झाले नसले तरी, साध्या पद्धतीने शहरात अनेक ठिकाणी विवाह सोहळे पार पडले. दरम्यान, विवाहानंतर विवाह ...
कोरोनामुळे यंदा धुमधडाक्यात लग्न झाले नसले तरी, साध्या पद्धतीने शहरात अनेक ठिकाणी विवाह सोहळे पार पडले. दरम्यान, विवाहानंतर विवाह नोंदणी करण्यासाठी जळगाव मनपा प्रशासाने पंचमुखी हनुमान मंदिराजवळील नानीबाई रूग्णालयात स्वतंत्र व्यवस्था केली आहे. या ठिकाणी विवाह नोंदणीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी डॉ. विजय घोलप यांची मनपा प्रशासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आहे.
त्यानुसार या ठिकाणी जानेवारी २०२० ते ८ डिसेंबर २०२० पर्यंत वर्षभरात एकूण ४७५ दाम्पत्यांनी विवाहाची नोंदणी केली आहे. दरम्यान, विवाह नोंदणी सक्तीची असली तरी नागरिक काही शासकीय कामासाठी गरज पडल्यावरच, विवाह नोंदणी करण्याला प्राधान्य देतात. तो पर्यंत अनेकजण विवाह नोंदणीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे, विवाह नोंदणी करणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे डॉ.घोलप यांनी सांगितले. तसेच कोरोनामुळेही यंदा विवाह नोंदणी कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.