सुमारे २० टक्के उमेदवारांनीच दाखल केले खर्चाचे विवरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:16 AM2021-01-23T04:16:46+5:302021-01-23T04:16:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल १८ जानेवारीला लागला. त्यानंतर आता विजयी आणि पराभूत अशा सर्व उमेदवारांना ...

Only about 20% of the candidates filed their expenditure statements | सुमारे २० टक्के उमेदवारांनीच दाखल केले खर्चाचे विवरण

सुमारे २० टक्के उमेदवारांनीच दाखल केले खर्चाचे विवरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल १८ जानेवारीला लागला. त्यानंतर आता विजयी आणि पराभूत अशा सर्व उमेदवारांना निवडणुकीत केलेल्या खर्चाचे विवरणपत्र सादर करावे लागणार आहे. त्यामुळे ते सादर करण्याची लगबग उमेदवारांनी सुरू केली आहे.

जळगाव तालुक्यातील १९९ उमेदवारांनी आतापर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीत केलेल्या खर्चाचे विवरण सादर केले आहे. जळगाव तालुक्यात ९७५ उमेदवारांनी निवडणुक लढवली. त्यातील फक्त १९९ उमेदवारांनी गुरूवारपर्यंत आपल्या निवडणुक खर्चाचे विवरण पत्र सादर केले होते. राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार या उमेदवारांना निकाल लागल्यापासून ३० दिवसांच्या आत आपल्या निवडणुक खर्चाचे विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार अनेक उमेदवार निवडणुकीनंतर विवरण पत्र सादर करत आहेत.

तहसील कार्यालयातील कर्मचारी करत आहेत घाई

जळगाव तहसील कार्यालयात प्रवेश केल्यावर डाव्या बाजुला लगेच निवडणुक खर्चाचे विवरण जमा करण्यासाठी आणि त्याची तपासणी करण्यासाठी काऊंटर लावण्यात आले आहे. तेथे चौकशी केली असता तेथील कर्मचारी लवकरात लवकर विवरण सादर करा, असे उमेदवारांना सांगत आहे. त्यामुळेच कदाचित तीन दिवसात २० टक्के उमेदवारांनी विवरण पत्र सादर केले आहे.

आकडेवारी

जळगाव तालुका

उमेदवारांची एकुण संख्या ९७५

खर्चाचे विवरण पत्र भरलेल्या उमेदवारांची संख्या १९९

एकुण सदस्य संख्या ४६३

जळगाव तालुक्यात सर्व विवरण ऑफलाईनच

जळगाव तालुक्यात आतापर्यंत ज्या उमेदवारांनी खर्च सादर केला आहे. त्या उमेदवारांनी ऑफलाईनच दिला आहे. त्यांनी पुर्वी प्रमाणे विवरणपत्र भरून आपला खर्च सादर केला आहे. तहसिल कार्यालयात त्यासाठी एक स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे.

Web Title: Only about 20% of the candidates filed their expenditure statements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.