अमृत अंतर्गत अपार्टमेंटला मिळणार एकच कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:45 AM2021-01-08T04:45:48+5:302021-01-08T04:45:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात असून, जूनपर्यंत ...

The only connection the apartment will get under Amrut | अमृत अंतर्गत अपार्टमेंटला मिळणार एकच कनेक्शन

अमृत अंतर्गत अपार्टमेंटला मिळणार एकच कनेक्शन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात असून, जूनपर्यंत हे काम पुर्ण होण्याची शक्यता आहे. ही योजना पुर्ण झाल्यानंतर अपार्टमेंटमधील फ्लॅटधारकांना नळ कनेक्शन वैयक्तिकरित्या द्यावे की अपार्टमेंटला एकत्रितरित्या द्यावे याबाबत संभ्रम कायम होता. अपार्टमेंटमधील फ्लॅटधारकांना वैयक्तिक कनेक्शन देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसून, यामुळे अनेक अडचणी येवू शकतात. त्यामुळे संपुर्ण अपार्टमेंटला एकच कनेक्शन दिले जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली.

गेल्या आठवड्यात झालेल्या मनपा स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी अमृत अंतर्गत देण्यात येत असलेल्या नळ कनेक्शनबाबत एकाच अपार्टमेंटमधील ८ पेक्षा जास्त ब्लॉकधारकांना कोणत्या प्रकारचे कनेक्शन द्यायचे ? असा प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत मनपा आयुक्तांनी सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून धोरण जाहीर करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मनपा आयुक्तांकडे मंगळवारी सर्व पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत अपार्टमेंटमध्ये केवळ एकच कनेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आयुक्तांनी सांगितलेले महत्वाचे मुद्दे

१. मनपाकडून अमृत अंतर्गत नळ कनेक्शन देण्याचे काम सुरु केले असून, जुन्या कनेक्शन धारकांना नवीन अर्ज न करता मनपाच्या खर्चातून नळ कनेक्शन दिले जात आहे.

२. अपार्टमेंटमध्ये कितीही फ्लॅटधारक असले तरी त्याठिकाणी एकच कनेक्शन दिले जाणार आहे.

३. अपार्टमेंटमधील रहिवाश्यांनी आपल्या अपार्टमेंटमध्ये एकत्रितरित्या सम किंवा पाण्याची टाकी तयार करावी, त्यानंतर अपार्टमेंटमधील मंडळानेच पाणीपट्टी देखील एकत्रितपणे मनपाकडे भरावी.

४. वॉटरमीटर बसल्यानंतर वैयक्तिक वापरानुसार बीले भरता येणार आहेत.

Web Title: The only connection the apartment will get under Amrut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.