जिल्ह्यात केवळ लाखभर ‘सर्जा-राजा

By Admin | Published: September 11, 2015 09:46 PM2015-09-11T21:46:33+5:302015-09-11T21:46:33+5:30

कधी काळी दोन लाखाच्यावर असलेल्या बैलांची संख्या यंदा केवळ एक लाख 386 एवढी मर्यादित झाली आह़े

Only a million people in the district are Sarja-Raja | जिल्ह्यात केवळ लाखभर ‘सर्जा-राजा

जिल्ह्यात केवळ लाखभर ‘सर्जा-राजा

googlenewsNext
दुरबार- दोन लाख 72 हजार हेक्टर पेरणीयोग्य शेतीक्षेत्र असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही वर्षात यांत्रिकी शेतीचा शिरकाव आणि वारंवार निर्माण होणारी चाराटंचाई यामुळे बैलांची संख्या घटली आह़े कधी काळी दोन लाखाच्यावर असलेल्या बैलांची संख्या यंदा केवळ एक लाख 386 एवढी मर्यादित झाली आह़े बैलांच्या घटलेल्या संख्येमुळे शेतक:यांना एकीकडे समस्या येत असतानाच शेतीपूरक उद्योगही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत़ जिल्ह्यातील तळोदा, नंदुरबार, सारंगखेडा, अक्कलकुवा, खापर, शहादा व मध्य प्रदेशातील खेतिया याठिकाणी भरणारे बैलबाजार पशूंअभावी बंद पडत आहेत़ बैलबाजाराला पूरक असलेल्या बैलगाडी बनवण्याच्या उद्योगालाही काही वर्षात उतरती कळा आल्याने कारगिरांची उपासमार होत आह़े

Web Title: Only a million people in the district are Sarja-Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.