बसस्थानकावर फक्त सहा प्रवाशांची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:16 AM2021-04-22T04:16:57+5:302021-04-22T04:16:57+5:30
उद्घाटनापूर्वीच दादऱ्यावरून वापर सुरू जळगाव : रेल्वे स्टेशनवर दादरा उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, कोरोनामुळे उद्घाटनाचे काम रखडले ...
उद्घाटनापूर्वीच दादऱ्यावरून वापर सुरू
जळगाव : रेल्वे स्टेशनवर दादरा उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, कोरोनामुळे उद्घाटनाचे काम रखडले आहे. परंतु, प्रवाशांनी उद्घाटनापूर्वीच दादऱ्यावरून वापर सुरू केला आहे. स्टेशनच्या आत-बाहेर अनेक प्रवासी या दादऱ्याचा व सरकत्या जिन्यांचा वापर करत आहेत.
जंतुनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी
जळगाव : शहरातील सुभाष चौक परिसरात साफसफाईअभावी मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने या परिसरात जंतुनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
महानगरी एक्स्प्रेसची वेळ बदलण्याची मागणी
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या महानगरी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आल्यामुळे, प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे या गाडीची वेळ पूर्वीप्रमाणे करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
रेल्वेगाड्यांमध्ये रात्रीचीही गस्ती
जळगाव : रेल्वे सुरक्षा बलातर्फे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रेल्वेगाड्यांमध्ये रात्रीचीही गस्त घालण्यात येत आहे. गाडीमधील प्रवाशांना त्यांच्या सामानाबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहेत. विशेष श्वानपथकाद्वारे लांब पल्ल्याच्या गाड्यांची तपासणीही करण्यात येत आहे.