वर्षभरात केवळ तीन पतसंस्था पडल्या अडचणीतून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 12:19 PM2019-11-08T12:19:22+5:302019-11-08T12:19:45+5:30

१०५ पतसंस्था अद्यापही अडचणीत : ३७ संस्थांवर आहे प्रशासक

 Only three credit institutions fell out of trouble during the year | वर्षभरात केवळ तीन पतसंस्था पडल्या अडचणीतून बाहेर

वर्षभरात केवळ तीन पतसंस्था पडल्या अडचणीतून बाहेर

Next

जळगाव : जिल्ह्यातील अडचणीतील १७८ पतसंस्थांपैकी अद्यापही १०५ पतसंस्था अद्यापही अडचणीत आहेत. तर केवळ ७३ पतसंस्था अडचणीतून बाहेर पडल्या आहेत. मात्र त्यापैकी वर्षभरात केवळ तीनच पतसंस्था अडचणीतून बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे सहकार विभागाचे पतसंस्थांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ठेवीदारांकडून होत आहे.
जिल्ह्यातील अडचणीतील १७८ पतसंस्थांपैकी ५६ पतसंस्था सहकार विभाग व शासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे २०डिसेंबर २०१६ पूर्वी अडचणीतून बाहेर पडल्या. तर १४ पतसंस्था १६ नोव्हेंबर २०१८ पर्यंत अडचणीतून बाहेर पडल्या. १६ नोव्हेंबर २०१८ नंतर आजपर्यंत केवळ तीनच पतसंस्था अडचणीतून बाहेर पडल्या आहेत. अजूनही १०५ पतसंस्था अडचणीत आहेत. म्हणजेच दिवसेंदिवस अडचणीतून बाहेर पडणाऱ्या संस्थांची संख्या कमीच होत आहे. याचा अर्थ जिल्हा उपनिबंधक कार्यालय तसेच राज्य शासनातर्फे यादृष्टीने अपेक्षित प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे.
ठेवीदारांची शनिवारी बैठक
जिल्ह्यातील पतसंस्थांच्या ई डी चौकशीच्या मागणीसाठी विभागीय आयुक्तांकडे होणाºया लोकशाही दिनात सहभागी होण्यासाठी ठेवीदारांची बैठक ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे आयोजित केली आहे.

अडचणीतून बाहेर पडण्याचे निकष
पतसंस्था अडचणीतून बाहेर पडलेली आहे. असे निश्चित करण्याचे निकष पुढील प्रमाणे आहेत.

-शासनाच्या २०० कोटी व उपवर अर्थसाह्याची संपूर्ण परतफेड केलेली असणे.
-संस्था ज्या कारणांनी अडचणीत आलेली होती ती कारणे दूर झालेली असणे.
-संस्था ठेवीदारांना ठेवी परत करीत नसल्याबाबत प्रशासनस्तरावर तक्रारी नसणे.
-ठेवी परत करीत नसल्याबाबत न्यायालयीन, ग्राहकमंच स्तरावर तक्रारी नसणे.
-संस्थेची एकंदरीत वसूली होऊन संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेली असणे.

Web Title:  Only three credit institutions fell out of trouble during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.