उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:22 PM2019-10-03T12:22:14+5:302019-10-03T12:22:57+5:30

जिल्ह्यात तीन दिवसात केवळ आठच अर्ज दाखल

Only two days left to file a nomination form | उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस

Next

जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ ३ व ४ आॅक्टोबर असे दोनच दिवस शिल्लक राहिले आहे. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्ह्यात तीन दिवसात ६९३ अर्ज वितरीत झाले. मात्र केवळ आठच अर्ज दाखल झालेले आहे. त्यामुळे शेवटच्या या दोन दिवसात अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार असल्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली. पहिल्या दिवशी तब्बल २१२ अर्ज वितरीत झाले. मात्र एकही अर्ज दाखल झालेला नव्हता. पहिल्या दिवशी जळगाव शहर मतदार संघात सर्वाधिक म्हणजे ६७ अर्ज वितरीत झाले होते. त्यानंतर २८ रोजी चौथा शनिवार व २९ रोजी रविवारची सुट्टी आल्याने थेट ३० रोजीच अर्ज वितरीत व दाखल झाले. या दिवशी जिल्ह्यात एकूण २८१ अर्ज वितरीत झाले. त्यातही जळगाव शहर मतदार संघातून सर्वाधिक ५१ अर्जांची विक्री झाली. ३० रोजी जिल्ह्यात पाचोरा व अमळनेर मतदार संघात प्रत्येकी एक असे एकूण दोन अर्ज दाखल झाले. १ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यात २०० अर्ज विक्री झाले. यात भुसावळ मतदार संघात सर्वाधिक ५९ अर्ज वितरीत झाले. तसेच १ रोजी जिल्ह्यात सहा अर्ज दाखल झाले.
जळगाव शहर मतदार संघात सर्वाधिक अर्ज वितरीत
जिल्ह्यात एकूण ६९३ अर्ज वितरीत झाले असून यामध्ये सर्वाधिक संख्या जळगाव शहर मतदार संघाची आहे. या मतदार संघात १ आॅक्टोबरपर्यंत १२८ अर्ज वितरीत झाले आहेत. मात्र दाखल एकही अर्ज झालेला नाही. त्या खालोखाल भुसावळ मतदार संघात ११५ अर्ज, रावेर मतदार संघात ७५ अर्ज वितरीत झाले.
तीन दिवसात आठ अर्ज दाखल
२७ सप्टेंबर ते १ आॅक्टोबर या दरम्यान कार्यालयीन कामकाजाच्या तीन दिवसात केवळ आठच अर्ज दाखल झाले आहेत. यात पहिला दिवस तर निरंक राहिला होता. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी दोन तर १ आक्टोबर रोजी सहा असे एकूण आठ अर्ज दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक तीन अर्ज अमळनेर मतदार संघात तर रावेरमध्ये दोन आणि चोपडा, पाचोरा, मुक्ताईनगर मतदार संघात प्रत्येकी एक अर्ज दाखल झाले आहेत. केवळ पाचच मतदार संघात अर्ज दाखल असून निम्म्याहून अधिक म्हणजेच सहा मतदार संघात दाखल अर्जांची संख्या शून्य आहे.
आजपासून दोन दिवस गर्दी
तीन दिवसात दाखल अर्जांची संख्या कमी असल्याने शेवटच्या दोन दिवसात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यात ३ रोजी बहुतांश मतदार संघात अधिक गर्दी होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच शेवटच्या दिवशी ४ रोजीदेखील उमेदवार शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल करण्याचा अंदाज आहे.
मतदार संघनिहाय वितरीत व दाखल अर्ज
मतदार संघ वितरीत अर्ज दाखल अर्ज
चोपडा - ५२ १
रावेर - ७५ २
भुसावळ - ११५ -
जळगाव शहर - १२८ -
जळगाव ग्रामीण - ६१ -
अमळनेर - ५१ ३
एरंडोल - १७ -
चाळीसगाव - ५७ -
पाचोरा - ३० १
जामनेर - ५६ -
मुक्ताईनगर - ५१ १
एकूण - ६९३ ८

Web Title: Only two days left to file a nomination form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.