ओपीडी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:16 AM2021-03-15T04:16:10+5:302021-03-15T04:16:10+5:30
ऑनलाईन सभा जळगाव : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या महिनाभरापूर्वी तहकूब करण्यात आलेल्या सभेचे सोमवारी ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. ...
ऑनलाईन सभा
जळगाव : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या महिनाभरापूर्वी तहकूब करण्यात आलेल्या सभेचे सोमवारी ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेत संसर्गाचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. २२ रोजी होणाऱ्या विशेष सभेबाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.
खड्डा जैसे थे
जळगाव : अजिंठा चौफुलीवरील रस्त्याच्या मधोमध असलेला खड्डा जैसे थे झाला असून यात मोठ्या अपघाताची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच तो तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्यात आला होता. मात्र, काहीच दिवसात हा खड्डा पुन्हा उघडा पडला असून या ठिकाणाहून धोकादायक पद्धतीने वाहन न्यावे लागत असल्याचे चित्र आहे.
सुरक्षा नाही
जळगाव : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात दोन कर्मचारी बाधित आढळून आल्यानंतरही कसल्याच उपाययोजना नसल्याचे अन्य कर्मचाऱ्यांचे म्हणणे असून त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. या ठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात आलेले नाही, शिवाय सोशल डिस्टन्सिंगही पाळले जात नाही.
चाळीसगावात संसर्ग घटला
जळगाव : चाळीसगावात गेल्या दोन दिवसांपासून रुग्णसंख्या घटत असल्याचे चित्र आहे. रविवारी चाळीसगाव तालुक्यात १० रुग्ण आढळून आले आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी शंभर किंवा त्यापेक्षा अधिक बाधित समोर येत होते. मुक्ताईनगरातही एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.
१२ रुग्ण आढळले
जळगाव : बाहेरील जिल्ह्यातील १२ नव्या रुग्णांची जिल्ह्यात रविवारी नोंद झाली आहे. यात उपचार घेणाऱ्यांची संख्या ही ४६ वर पोहोचली आहे. एकूण रुग्णांची संख्या ही ६०९ वर पोहोचली आहे. यापैकी ५६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रविवारी आरटीपीसीआर चाचणीत हे १२ रुग्ण समोर आले आहेत.