स्वत:च्या अपहरणाचा बनाव उघड

By admin | Published: June 2, 2017 08:01 PM2017-06-02T20:01:19+5:302017-06-02T20:01:19+5:30

आयपीएल क्रिकेट सट्टाबेटिंगमध्ये १० लाख रुपये हरणाऱ्या फैजपूर येथील तरुणाने स्वत:च्या अपहरणाचा बनाव करीत १० लाखांची खंडणी मागत घरच्यांसह पोलिसांना

Open the hand of the kidnapping | स्वत:च्या अपहरणाचा बनाव उघड

स्वत:च्या अपहरणाचा बनाव उघड

Next

ऑनलाइन लोकमत

मुक्ताईनगर, दि. 02 -  आयपीएल क्रिकेट सट्टाबेटिंगमध्ये १० लाख रुपये हरणाऱ्या फैजपूर येथील तरुणाने स्वत:च्या अपहरणाचा बनाव करीत १० लाखांची खंडणी मागत घरच्यांसह पोलिसांना चक्रात टाकणाऱ्या तरुणास पुणे येथून त्याच्या २ साथीदारांसह ताब्यात घेण्यात आले आहे.
फैजपूर येथील रितेश अविनाश नेमाडे (वय २३) याने काही दिवसांपूर्वी अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर येथे छुप्या स्वरूपात अवैध सट्टा बेटिंगचा व्यवसाय सुरू केला होता. या निमित्ताने तो अंतुर्ली येथे यायचा. २४ मे पासून हा तरुण अचानक बेपत्ता झाला. त्यावेळेस त्याच्या नातेवाईकांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला. मात्र, तो कोठेच सापडला नाही. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत तो हरवला असल्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसाने त्याच्या नातेवाईकांना त्याचे हातपाय बांधलेले फोटो, त्याच्या अपहरणाचे फोन येवू लागले आणि दहा लाखांची मागणी होत होती. या संदर्भात त्याच्या नातेवाईकांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन गाठत हा प्रकार पोलीस निरिक्षक अशोक कडलग यांना सांगितला.
अगोदरच बालशौर्य पुरस्कार प्राप्त निलेश भिल्ल व त्याच्या भावाच्या शोधात हैराण असलेले पोलीस या नव्या अपहरण व खंडणी प्रकरणाने पुरतेच गोंधळले. पोलीस निरीक्षक कडलग यांनी ज्या मोबाईल क्रमांकावरून या तरुणाचे फोटो व व्हिडीओ कॉल येत होते त्याचा ५ दिवस तपास लावला. पुणे येथून हे व्हिडीओ कॉल होत असल्याची खात्री पटल्यानंतर तत्काळ उपअधीक्षक सुभाष नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक नेमले. त्यात पोलिस उपनिरीक्षक सचिन इंगळे, कॉन्स्टेबल विनोद पाटील, हवालदार संतोष नागरे, संजय भोसले, जावळे यांनी पुणे गाठत रितेश याचे दोन मित्र प्रकाश गणेश महाजन व देवानंद कैलास पाटील यांना मोबाईल नंबरच्या आधारावर गाठले. दोघांना खाक्या दाखवताच त्यांनी रितेशचा पत्ता सांगितला. त्यातून पुण्यातील क्रिकेटवाडीत छापा टाकला असता तेथे स्वत: च्या अपहरणाचा बनाव करणारा व लपून असलेला रितेश मित्राच्या खोलीवर मिळून आला. येतूनच मित्राकरवी हातपाय बांधलेले फोटो व खंडणीची रकमेची मागणी करीत असल्याचा प्रकार पोलिसी खाक्या दाखवताच उघड झाला.
पोलीस तपासात त्याने मागील महिन्यात आयपीएल क्रिकेट सामने सुरू होते. या सामन्यात त्याने सट्टा खेळला व या बेटिंग़मध्ये दहा लाख रुपये हरल्यामुळे पैशांसाठी घरच्यांना त्रास देण्याच्या हेतूने, असा प्रकार केल्याचे कबूल केले. तसेच,  स्वत: च्याच अपहरणाचा बनाव करणारा या रितेश नेमाडे़ला मुक्ताईनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्याचे दोन मित्रदेखील पोलिसांच्या ताब्यात आहेत. घरच्यांसह नातेवाईकांना अपहरणाबाबत कॉल करताना थेट व्हाईस कॉलऐवजी इंटरनेटचा वापर करीत व्हिडीओ कॉल व मेसेंजरचा वापर करीत बनवा-बनवी करण्यात आली. त्यामुळे घरच्या मोबाईलवर नंबर दुसराच यायचा व नंबर मात्र तिसऱ्याच मोबाईलने होत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. 

Web Title: Open the hand of the kidnapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.