बंदी असतानाही धरणगावात गुटख्याची खुलेआम विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 02:15 PM2020-11-22T14:15:39+5:302020-11-22T14:16:13+5:30

राज्यात गुटखा बंदी झाली असली, तरी गेल्या कित्येक वर्षांपासून छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री सर्रास सुरू आहे.

Open sale of gutkha in Dharangaon despite ban | बंदी असतानाही धरणगावात गुटख्याची खुलेआम विक्री

बंदी असतानाही धरणगावात गुटख्याची खुलेआम विक्री

googlenewsNext

धरणगाव : राज्यात गुटखा बंदी झाली असली, तरी गेल्या कित्येक वर्षांपासून छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री सर्रास सुरू आहे. धरणगाव तालुक्यातही गुटख्याची अशा पद्धतीने सर्रास विक्री होत आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा पायदळी तुडवीत शहरातील प्रत्येक पानटपरींवर अवैधरीत्या गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूची राजरोसपणे सर्रास विकली जातेय.
पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शहरात १०० हून छोट्या-मोठ्या पानटपऱ्या आहेत. या टपऱ्यांपैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त टपऱ्यांमध्ये गुटाख्याची सर्रास विक्री होत आहे. अनेक पानटपरीचालक गुटख्याची पाकिटे लपवून ठेवून विक्री करतात, तर काही पानटपरी चालक उघडपणे गुटख्याची विक्री करताना दिसतात. अनेक टपरीचालकांचे चौकांतील पोलिस तसेच गस्तीवरील पोलिसांशी साटेलोटे असल्याने बिनदिक्कतपणे गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे बोलले जात आहे.
धक्कादायक म्हणजे यातील काही पान टपऱ्यांवर गुटख्यासोबत देशी दारूदेखील विकली जाते. काही ठिकाणी तर गांजादेखील विकला जातो. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात विक्रीसाठी गुटखा सहज उपलब्ध होत आहे. मध्य प्रदेशातून शहरात गुटखा दाखल होतो. गुटखा तस्करांकडून पानटपरींवर तो पोहचतो व शहरात प्रत्येक पानटपरींवर ह्यमागेल त्यांना गुटखाह्ण मिळत असतो.
शाळेच्या परिसरात गुटखा विक्रीस बंदी असूनही अनेक टपऱ्या, दुकानांत गुटख्याची पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुटख्याचे व्यसन वाढल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी नोंदविले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या प्रमाणात गुटखा पकडला होता. पण तरीदेखील गुटखा मोठ्या प्रमाणात विकला जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतेय.

शाळेच्या परिसरात अनेक पानटपऱ्यांवर गुटका सर्रास मिळत असल्याने विद्यार्थ्यांनाही तो खावासा वाटतो, परिणामी त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. एकीकडे आम्ही तंबाखूमुक्त शाळा करण्याकामी प्रयत्न करत आहोत तर दुसरीकडे सर्व गाव जर तंबाखू युक्त असेल तर व्यसन मुक्त अभियानाचा काहीही उपयोग होणार नाही. कोरोना काळ असूनही गुटका खाऊन थुंकणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. याचाही परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे. यासाठी आम्ही आमच्या शाळेच्या परिसरात गुटका खाऊन थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत आहोत.
-डॉ.संजीवकुमार सोनवणे, मुख्याध्यापक, पी.आर.हायस्कूल, धरणगाव

Web Title: Open sale of gutkha in Dharangaon despite ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.